Sangli News: प्रांताधिकार्‍याच्या अतिक्रमणामुळे दांपत्याने उच्चलं मोठं पाऊल; कार्यालयातच जीवन संपवण्यासाठी...

सांगलीतल्या एका दाम्पत्याने हक्काच्या जागेसाठी आता थेट मरणाचा मार्ग स्वीकारला आहे.
Sangli News
Sangli NewsSaam Tv

Sangli News Today: सांगलीतल्या एका दाम्पत्याने हक्काच्या जागेसाठी आता थेट मरणाचा मार्ग स्वीकारला आहे. पतीने विशेष पोलीस महानिरीक्षकांच्याकडे इच्छा मरणाची परवानगीची मागणी केली आहे. तर पत्नीने थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. शहरातल्या त्यांच्या मिळकतीच्या जागेवर एका प्रांताधिकारी असणाऱ्या एका अधिकाऱ्याकडून अतिक्रमण करण्यात आल्याचा आरोप करत दांपत्याने हे टोकाचे पाऊल उचलेले आहे. (Latest Marathi News)

Sangli News
Pune Water Cut: पुणेकरांना पाणीकपातीची झळ बसणार, संपूर्ण शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

सांगली शहरातल्या दक्षिण शिवाजीनगर इथल्या जुण्यामाळी चित्र मंदिराच्या मागील बाजू सुनील पाटील यांनी 2006 मध्ये दोन गुंठे जागा खरेदी केली. त्याची रीतसर नोंद देखील केली. त्यांच्याकडे असणाऱ्या उपलब्ध कागदपत्रांच्या अनुसार त्यांच्या आणि जुन्या मालकाच्या मध्ये 2 हजार 100 स्क्वेअर फुट जागेची खरेदी झाली.

यानंतर पाटील यांच्या असणाऱ्या भूखंडावर पूर्वीच्या बाजूने सुमारे 300 स्केवर फूट अतिक्रमण झाले आहे. त्यांच्या जागे शेजारी असणाऱ्या गजानन गुरव यांनी हे अतिक्रमण केल्याचा आरोप सुनील पाटील यांनी केला आहे. गजानन गुरव हे पंढरपूर (Pandharpur) या ठिकाणी सध्या प्रांताधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

उच्च अधिकारी असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा गैर गैरवापर करत आपल्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप देखील केला आहे.. याबाबत पाटील यांनी अगदी जागेशी संबंधित असणाऱ्या विविध विभागांमध्ये पोलीस (Police) ठाण्यामध्ये तक्रारी केल्या,मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. (Sangli News)

याप्रकरणी सुनील पाटील यांनी जागेचे मूळ मालक माळी यांच्या समवेत गुरव यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. गुरव यांनी आपल्या जागेवर आता बांधकाम केला आहे. याला महापालिकेकडून बांधकामाची परवानगी देखील मिळाली आहे. त्यामुळे पाटील कुटुंब पुन्हा या आपल्या जागेच्या मिळकतीवरून आक्रमक झाले आहे.

Sangli News
Political News: सत्तेत असताना अजितदादा ज्या मस्तीत वागत होते, त्याच्या 10 टक्केही मुख्यमंत्री वागत नाहीत; शिवसेनेच्या खासदारांची खोचक टीका

गुरव एक उच्च अधिकारी असल्यामुळे त्यांच्याकडून पदाचा गैरवापर करत प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून कारभार सुरू असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे न्याय मिळत नसल्याने पाटील दांपत्य हतबल झाले असून त्यांनी आता शेवटचा मार्ग म्हणून मरणाचा मार्ग स्वीकारला आहे.. सुनील पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे इच्छा मरण अर्ज दाखल केला आहे. आपल्याला न्याय मिळत नसल्याने इच्छा मरण द्यावे,अशी मागणीचे निवेदन त्यांनी दिले आहे. (Maharashtra News)

तर दुसऱ्या बाजूला महापालिकेकडे तक्रार दाखल करून देखील गुरव यांना बांधकाम परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे मनस्तापाने आपल्या पतीला इच्छा मरण मागण्याची वेळ आली असल्याने, पाटील यांच्या पत्नी सारिका पाटील यांनी थेट महापालिकेच्या कार्यालयात जाऊन महापौरांच्या दालनामध्ये अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com