Dumping Body in Suitcase: हत्येचा 'सुटकेस पॅटर्न', कधी आणि केव्हा घडल्या होत्या अशा घटना

Vasai Live in relationship: हत्या करून सुटकेसमध्ये भरून मृतदेहाचा विल्हेवाट लावण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. हत्येचा 'सुटकेस पॅटर्न' अनेक घटनांमध्ये वापरण्यात आलाय.
Dumping Body in Suitcase
Dumping Body in SuitcaseSaam Tv

Dumping Body in Suitcase:

वसईमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेल्या एका तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी कॉस्टयूम डिझाईनचं काम करणाऱ्याला तरुणाला आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे. आरोपी तरुण आणि मृत तरुणी हे पाच वर्षांपासून प्रेम संबंधात होते. आरोपी तरुण विवाहित असतानाही त्याचे मृत तरुणीसोबत प्रेमसंबंधात होते. त्या तरुणानं प्रेयसीपासून दूर होण्याचा निर्णय घेतला. (Latest News on Crime)

परंतु तरुणी त्याला सोडण्यास तयार नव्हती. शेवटी पती पत्नीने ठरवून तरुणीच्या हत्येचा कट रचला. तरुणीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दोघांनी तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि वापीमध्ये फेकला. दरम्यान हत्या करून सुटकेसमध्ये भरून मृतदेहाचा विल्हेवाट लावण्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. हत्येचा 'सुटकेस पॅटर्न' अनेक घटनांमध्ये वापरण्यात आलाय.

२ जून २०२३: मध्ये भाईंदर येथील उत्तन समुद्रकिनारी एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा शिर नसलेला मृतदेह आढळून आला होता. तेथील काही स्थानिकांना मॉर्निंग वॉक करताना सुटकेस दिसून आली होती. त्यानंतर त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. भाईंदर सागरी उत्तन पोलिसांनी मृतदेहाच्या हातावर असलेल्या टॅटूवरून त्याची ओळख पटवली होती. हा मृतदेह अंजली सिंग नावाच्या एका विवाहित महिलेचा होता.

याप्रकरणात पोलिसांनी तिचा नवरा मिंटू सिंग आणि नवऱ्याच्या मोठा भाऊ चुंचुनला अटक केली होती. अंजलीचं विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचा संशय या दोघांना होता. या संशयावरून त्यांनी तिची हत्या केली होती. त्यानंतर तिचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला होता.

ऑगस्ट २०२२ : २६ ऑगस्ट रोजी अंधेरी येथील नायगावजवळील रस्त्याच्या बाजुला असलेल्या झुडपात सुटकेस आढळून आली होती. या सुटकेसमध्ये ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळला होता. हा मृतदेह १४ वर्षीय वंशिता कन्हैयालाल राठोड हिचा होता. या मृतदेहावर चाकूचे वार करण्यात आले होते.

मृतदेह सापडून एक आठवड्याचा कालावधी गेल्यानंतर पोलिसांनी गुजरात राज्यातील पांलपूर येथून २ जणांना अटक केली. या दोघांनी या मुलीचं अपहरण केलं होतं आणि नंतर तिची हत्या केली होती.

जुलै २०२१ : सुटकेस पॅटर्नचा वापर २०२१ च्या जुलै महिन्यातही झाला होता. वसई पश्चिमेतील भुईगावाजवळ पोलिसांना एका सुटकेसमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पाण्याच्या कालव्यामध्ये ही सुटकेस आढळून आली होती. पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी हा मृतदेह मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवला होता. परंतु या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले नाही. दरम्यान पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत तपास कायम चालू ठेवला.

मार्च २०२१ : नालासोपारा पूर्वमध्ये २८ मार्च २०२१ मध्ये एका अज्ञात २० वर्षीय महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळला होता. ही सुटकेस नालासोपारा पूर्वेतील श्रीराम नगरच्या मुख्य रोडवर आढळली होती. काळ्या रंगाच्या सुटकेसमधील मृतदेह पूर्णत: कुजलेला होता. मृत महिलेचं तोंड कपड्यानं बांधले होते. या महिलेची हत्या गळा आवळून करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं होतं.

फेब्रुवारी २०२० : मध्ये डोंबिवलीतील बावनचाळ येथील रेल्वे रुळाजवळ एका सुटकेसमध्ये एका ५६ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. एका ५६ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ टाकलेल्या सुटकेसमध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आला. ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी शाखेनं ९ तासांत या प्रकरणाचा छडा लावत डोंबिवलीतील २७ वर्षीय टुरिस्ट कार ऑपरेटर प्रफुल पवार या तरुणाला अटक केली होती.

पोलिसांना सुटकेसमध्ये मिळालेला मृतदेह हा कोपरी येथील रहिवाशी नवी मुंबई येथील कर्ज निवारण न्यायाधिकरण कार्यालयातील सहायक क्लर्कचा होता. मृत व्यक्तीचे नाव उमेश पाटील होतं. पाटील यांचे पवार यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. पवारच्या पत्नीशी असलेले संबंध उघड करण्याची धमकी उमेश पाटील देत होता. त्यावरून प्रफुल पवार याने पाटीलची हत्या केली होती.

डिसेंबर २०१९ : सुटकेस पॅटर्नची घटना डिसेंबर २०१९ मध्येही घडली होती. मुंबई पोलिसांना वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) परिसरात मिठी नदीत एक सुटकेस सापडली होती. यामध्ये ५९ वर्षीय बेनेट रेबेलो नावाच्या व्यक्तीचा मृतदेह होता. मारेकऱ्यांनी त्याच्या शरीराचे तुकडे केले होते. पोलिसांना २ डिसेंबर रोजी माहीममध्ये एका सुटकेसमध्ये रेबेलोचा पाय, एक हात आणि प्रायव्हेट पार्ट सापडले होते.

मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी चार दिवसानंतर या हत्येप्रकरणात दोन जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये रेबेलोने दत्तक घेतलेल्या मुलीचाही समावेश होता. रेबेलोने रियाला दत्तक घेतले होते. परंतु तिचे एका मुलाशी प्रेमसंबंध होते. ते रेबेलोला मान्य नव्हते. याचा राग मनात घेत रेबेलो दत्तक मुलीवर अत्याचार करत असायचा.

जून २०१९: नालासोपारा येथील तुळींज पोलिसांना श्रीराम नगर येथील नाल्यात नायलॉनच्या पिशवीत भरलेला मृतदेह सापडला होता. मृत व्यक्तीचा चेहरा ओळखता येत नाहीये. नंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख कृष्णा अशी झाली. त्याची लिव्ह-इन-पार्टनर ज्योतीने तिचा प्रियकर मुख्तारने त्याची हत्या केली होती.

Dumping Body in Suitcase
Hyderabad Restaurant Crime: बिर्याणीसोबत दही मागितल्याने हत्या; रेस्टॉरंटमधील थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com