'सरकार आल्यानंतर अपेक्षा वाढतात, पण...'; मंत्रिमंडळ विस्तार चर्चेत असतानाच फडणवीसांनी इच्छुकांना स्पष्टच सांगितलं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात भाजपच्या किती नेत्यांना सरकारमध्ये संधी मिळणार आणि इच्छुकांच्या अपेक्षांवर भाष्य केलं आहे.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissaam tv

सुशांत सावंत

पनवेल : राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारभार चालवत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून दोघेच सरकार चालवत आहे, असा आरोप होते आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार आहे, त्यात कुणाला संधी मिळणार? या चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात भाजपच्या किती नेत्यांना सरकारमध्ये संधी मिळणार आणि इच्छुकांच्या अपेक्षांवर भाष्य केलं आहे. ( Devendra Fadnavis News In Marathi)

Devendra Fadnavis
दादा आपण भोळे लोक, शिवसेना, राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं; फडणवीसांचा गंभीर आरोप

आज भाजपने प्रदेश कार्यकारिणीची बैठक पनवेलमध्ये आयोजित केली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी फडणवीस यांनी राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केलं. फडणवीस म्हणाले, 'सरकार आल्यानंतर आपल्या अपेक्षा वाढतात. काही प्रमाणात अपेक्षा पूर्ण होतील. मात्र, आपल्याला त्यांना सोबत घेऊन सरकार चालवायचं आहे. त्यामुळे सर्वांच्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील असं बोलणं योग्य ठरणार नाही. तुम्ही अडीच वर्षात कमी अपेक्षा ठेवून पुढच्या वेळी बहुमताचं सरकार कसं आणता येईल, याचा विचार आपण केला पाहिजे'.

'विधान परिषदेसाठी १२ आमदार आहेत. या जागेसाठी २०० इच्छुक या सभागृहात आहेत. तर १२०० लोक मला बायोडाटा देऊन गेले आहेत. मात्र, सर्व नियमांचा विचार करावा लागेल. त्यातल्या काही जागा या शिवसेनेला द्याव्या लागेल. काही जागा आपल्याला मिळतील. मागच्या अडीच वर्षात आपण भरपूर संघर्ष केला. संघर्षाच्या काळात आपण एक होतो. आता समाजासाठी काम करायचं आहे, म्हणून एकजूट महत्वाची आहे. आपला घराणेशाही मानणारा पक्ष नाही. भाजप ही कोणाची खासगी कंपनी नाही', असेही ते म्हणाले.

Devendra Fadnavis
'माझी पोलीस सुरक्षा काढून टाका', एकनाथ शिंदे गटातील खासदाराचे पोलिसांना पत्र

दरम्यान, फडणवीस यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील टीका केली.'आता ९ वाजता बोलणारे अलीकडे कमी बोलायला लागले आहे. कारण काय तसं कळत नाही. मात्र, तुम्ही त्यांना शिव्या देऊ नका, त्यांचे आभार माना. आताचं सरकार येण्यामागे त्यांचा वाटा आहे. त्यांनी सर्वांना वैताग आणला. त्यामुळे अनेकांना वाटलं की, हा जर लाऊडस्पीकर बंद करायचा असेल, तर सरकार बदललं पाहिजे',

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com