Kass : तिढा सुटला; राजेंची मागणी मान्य, कास पठार ई बस 'येथून' धावणार

कास पठारच्या विकासाला निश्चीत वाव देण्यात येईल असंही लाेढा यांनी नमूद केले.
satara, kaas plateau , Kass Pathar , Mangal Prabhat Lodha, Shivendrasinhraje Bhosale
satara, kaas plateau , Kass Pathar , Mangal Prabhat Lodha, Shivendrasinhraje Bhosalesaam tv

Kass Pathar : सातारा (satara) जिल्ह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार असून यासाठी आज राज्याचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा (Mnagal Prabhat Lodha) यांच्या हस्ते तिथे सुरू करण्यात येत असलेल्या चार ई बसेसचे (E Bus For Kass Pathar) तसेच बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करणे, स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा तयार करणे, सुरक्षा वाढविणे तसेच घनकचरा व्यवस्थापन याबाबतही कार्यवाही करण्यात येईल असे मंत्री लोढा यांनी लाेकापर्ण कार्यक्रमात नमूद केले. (Kass Plateau Latest Marathi News)

आज मंत्रालयातून मंत्री लोढा यांच्या हस्ते दूरचित्रप्रणालीव्दारे ई-बसेसचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मंत्री लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सरपंच यांचे आभार मानले. कास पठाराच्या संवर्धनासाठी तसेच या माध्यमातून स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

मंत्री लोढा म्हणाले पर्यटन विकासासाठी सर्वांचेच सहकार्य आवश्यक आहे. स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असलेले कास पर्यटनाचा ठेवा जपण्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या ठिकाणी वन्य प्राण्यांचा वावर वाढून नैसर्गिक रित्या कास पठार अधिक फुलावे यासाठी पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाने नवीन महाबळेश्वरचे जे धोरण तयार केले आहे त्यामध्येही कास पठारच्या विकासाला निश्चीत वाव देण्यात येईल असंही लाेढा यांनी नमूद केले.

satara, kaas plateau , Kass Pathar , Mangal Prabhat Lodha, Shivendrasinhraje Bhosale
Sports : तिच्याशी झटायचा, अश्लील व्हिडीओ पाठवायचा; क्रीडा प्रशिक्षकास अटक

यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले कास पठारावरील प्रदुषण रोखण्यासाठी ई-बसची सेवा प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा शासनाचा चांगला निर्णय आहे. कास पठारावरील प्रदुषण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत व वन विभागाची वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना आणखीन सुविधा तसेच नवीन पर्यटन स्थळांची निर्मिती करावी यासाठी नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीस यश

पर्यटन विभाग पर्यावरण पुरक पर्यटन संकल्पने अंतर्गत कासच्या यंदाच्या हंगामा करिता ४ ई- बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. या बसेस कासणी गावापासून कास पठारापर्यंत अर्धा किलाे मीटर पर्यंत चालविण्यात येणार आहेत असे प्रशासनाने कळविले आहे. यामुळे या परिसरात वाहनांमुळे होणाऱ्या प्रदुषणास आळा बसण्यास मदत होईल असेही प्रशासनाने म्हटलं आहे. दरम्यान ई - बस कासाणीपासून धावणार असल्याने या परिसरातील ग्रामस्थ आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्या पाठपूराव्याला आणि मागणीस यश आले आहे. यापुर्वी गणेश खिंड येथून बस धावणार हाेती. त्यामुळे वाद निर्माण झाला हाेता.

Edited By : Siddharth Latkar

satara, kaas plateau , Kass Pathar , Mangal Prabhat Lodha, Shivendrasinhraje Bhosale
Udayanraje Bhosale : पाडा त्यांचे बांधकाम ! 'कास' अतिक्रमणावरुन उदयनराजेही भडकले
satara, kaas plateau , Kass Pathar , Mangal Prabhat Lodha, Shivendrasinhraje Bhosale
Shivendrasinhraje Bhosale : पहिल्यांदा आमच्यावर बुलडोजर चालवा..., शिवेंद्रसिंहराजे भडकले

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com