
अकोला : जिल्ह्यातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. अकोला (Akola) शहारापासून २३ किमी अंतरावर असलेल्या बार्शी टाकळीजवळ भुकंपाचे धक्के बसले आहेत. ही घटना आज सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या परिसरात भुकंपाचे सौम्य धक्के (Earthquake) बसल्याने मालमत्तेची कोणत्याही प्रकारचे नुकसाना झालेले नाही. तसेच नागरिकांच्या जीवाला धोकाही निर्माण झाला नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी (No casualties) झाली नसल्याची माहिती समोर आलीय.
या घटनेबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आलेली माहिती अशी की, आज सायंकाळी ५ वाजून ४१ मि.१८ सेकंदांनी बार्शी टाकळीजवळ भुकंपाचे सौम्य धक्के बसले. २०.५३०N व ७७.०८०E या अक्षांश रेखांशावर हे केंद्र असून रिक्टर स्केल वर ३.५० इतकी तीव्रता नोंदविण्यात आली.
तसेच भुकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतेही नुकसान झाले नाही,अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे. अकोल्याचे हवामान विभागाचे सहायक वैज्ञानिक मिलिंद धकिते व कार्तिक वनवे यांनी याबाबत भारतीय सेस्मॉलॉजीकल विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाच्याआधारे हीमाहिती दिली आहे.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.