Earthquake Kolhapur : रात्री भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

पश्चिम महाराष्ट्रात मध्यरात्रीच्या सुमारास कोल्हापुरात भूकंपाचा धक्का जाणवला
Earthquake Kolhapur : रात्री भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Earthquake Kolhapur : रात्री भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणSaam Tv

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात Western Maharashtra मध्यरात्रीच्या सुमारास कोल्हापुरात भूकंपाचा धक्का Earthquake जाणवला असल्याचे वृत्त समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात Kolhapur रात्री १२ वाजेच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

हे देखील पहा-

भूकंपाच्या या धक्क्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली होती. Seismo.gov.in च्या वेबसाईटवर सांगितलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर या ठिकाणी रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला आहे. भूकंपाची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे.

कोल्हापुर पासून १९ किलोमीटर पश्चिमेकडे भूकंपाचे केंद्र असल्याचे यावेळी सांगितले जात आहे. न्यूज एजन्सी एएनआयने देखील या संदर्भात वृत्त दिले आहे.

Earthquake Kolhapur : रात्री भूकंपाचा धक्का, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कोयना परिसरात भूकंपाचा धक्का, कोयना-पाटण परिसर हादरला

रात्रीच्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे. भूकंपाचे धक्के बसताच, अनेक नागरिकांनी घराबाहेर पळ काढला होता. भूकंपाची तीव्रता ही फार जास्त नसल्याने धरणीकंपामुळे नागरिक हे भयभीत झाले होते.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com