ED seized Poonawalla properties: ईडीची मोठी कारवाई! झवरेह सोली पूनावाला यांच्या ४१ कोटींच्या स्थावर मालमत्ता जप्त

ED action against Zavareh Soli Poonawalla: पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी एलआरएस योजनेच्या तरतुदींचा गैरवापर करून परदेशात परकीय चलन पाठवले होते.
ED action against Zavareh Soli Poonawalla
ED action against Zavareh Soli Poonawallasaam tv

ED seized Zavareh Soli Poonawalla properties : झवरेह सोली पूनावाला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध केलेल्या तपासात अंमलबजावणी संचालनालयाने FEMA च्या तरतुदींनुसार वरळीतील सीजे हाऊस येतील 41.64 कोटी रुपयांच्या तीन स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. ईडीकडून (ED) झवरेह सोली पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध FEMA च्या तरतुदींखाली लिबेरलाइज्ड रेमिटन्स स्कीमच्या (LRS) गैरवापराच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पनामा पेपर्समध्ये ऑफ-शोअर संस्थांसंदर्भातील खुलाशांमध्ये त्याचे नाव आढळून आल्याचे इडीने म्हटले आहे.

पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी एलआरएस योजनेच्या तरतुदींचा गैरवापर करून परदेशात परकीय चलन पाठवले होते. त्यांनी कमाल अनुज्ञेय मर्यादेचा वापर केला आणि वर्ष 2011-12 पासून त्यांनी चुकीच्या पद्धतीने परदेशात पैसे पाठवल्याचे ईडीच्या तपासात असे सिद्ध झाले आहे.

ED action against Zavareh Soli Poonawalla
Students Airlift from Manipur : मोठी बातमी! मणिपूरमधून विशेष विमानाने आलेले विद्यार्थी मुंबईत सुखरुप दाखल

तसेच 'कौटुंबिक देखभाल आणि स्वत:ची देखभाल' या बहाण्याने त्यांनी पैसे पाठवले असले तरी वास्तवात त्यांच्या कुटुंबातील एकही सदस्य परदेशात राहत नव्हता हे देखील ईडीच्या तपासातून सिद्ध झाले आहे. पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी LRS अंतर्गत पाठवलेला संपूर्ण निधी BVI स्थित स्टॉलस्ट लिमिटेडमध्ये (Stallast Limited ) गुंतवल्याचेही समोर आले आहे.

स्टॉलस्ट लिमिटेडने (Stallast Limited) पूनावाला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पाठवलेला निधी यूकेमध्ये चार मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरला. या मालमत्तांमध्ये पॅडिंग्टन आणि लंडन येथील चार अपार्टमेंटचा समावेश आहे. या व्यवहारांमध्ये FEMA चे उल्लंघन दिसून आले आहेत. (Breaking News)

ED action against Zavareh Soli Poonawalla
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची सुपरहिट योजना, महिन्याला 12000 रुपये गुंतवून 1 कोटी कमावण्याची संधी

परदेशातील मालमत्ताबाबतचा अहवाल आरबीआयला द्यावा लागू नये यासाठी LRS अंतर्गत पाठविलेल्या निधीद्वारे त्यांचे अधिग्रहण करण्यात आले. अशा प्रकारे लिबेरलाइज्ड रेमिटन्स स्कीमचा गैरवापर केल्याने झवरेह पूनावाला यांच्याकडे भारतात असलेल्या समतुल्य मूल्याच्या मालमत्तांच्या FEMA च्या कलम 37A च्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आल्या आहेत. ईडीने FEMA अंतर्गत आदेश पारित करून सीजे हाऊस, वरळी, मुंबई येथील कार्यालयाची जागा ताब्यात घेतली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com