ईडीची सूडबुद्धीने कारवाई ; एकनाथ खडसे

भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी गिरीश चौधरी यांच्यासह माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सहभागाबाबत ईडी तपास करत आहे.
ईडीची सूडबुद्धीने कारवाई ; एकनाथ खडसे
ईडीची सूडबुद्धीने कारवाई ; एकनाथ खडसे saan tv

सूरज सावंत

पुण्यातल्या भोसरी एमआयडीसी (Bhosari MIDC) जमिन गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) समन्स बजावल्यानंतर सकाळी ११च्या सुमारास एकनाथ खडसे (Eknath Khadase) हे ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना ईडीने या पूर्वी अनेक वेळा या प्रकरणात चौकशी केली असून भाजपमधून (BJP) राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केल्याने सूड बुद्धीने ही कारवाई होत असल्याचा आरोप केला आहे. (ED is taking vengeful action; Eknath Khadse)

ईडीची सूडबुद्धीने कारवाई ; एकनाथ खडसे
प्रकृती खालावल्याने एकनाथ खडसे ईडी कार्यालयात हजर राहणार का?

भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी गिरीश चौधरी यांच्यासह माजी महसुल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सहभागाबाबत ईडी तपास करत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) 2017 मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडीने या प्रकरणाच्या तपासला सुरूवात केली. दरम्यान, ईडी आता याप्रकरणी मनी लाँडरींग झाली आहे का, याबाबत तपास करत आहे. गुन्ह्यांत सहभागी मालमत्तेतील काळा पैसा पुन्हा बाजारात फिरवण्यात आल्याबाबत तपास करण्याचा अधिकार ईडीला आहे. जून्या गुन्ह्यांच्या आधारावर प्रोव्हीजन ऑफ द प्रीव्हेंन्शन ऑफ मनी लाँडरींग अंतर्गत ईडी अशा प्रकरणात तपास करते आहे. यापूर्वी याप्रकरणी खडसे यांचीही ईडीने चौकशी केली होती. त्यावेळी खडसे यांनी आपण ईडीला तपासात संपूर्ण सहकार्य करत असून त्यांनी पुन्हा बोलवल्यास येथे येऊन त्यांना चौकशीला मदत करू, असे खडसे यांनी त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले होते. खडसे हे भारतीय जनता पार्टी सोडून नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले होते. तेव्हापासून याप्रकरणाच्या चौकशीला ईडीकडून वेग आला आहे.

भोसरी येथील जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुण्यातील एक व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी केला होता. तक्रारीनुसार या जमीनीची किंमत सुमारे 40 कोटी रुपये असताना ती केवळ 3.75 कोटी रुपयांमध्ये खडसेंच्या कुटुंबियांना विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2018 मध्ये एसीबीने केलेल्या तपाात खडसे यांना क्लीनचीट देण्यात आली होती. त्यावेळी सरकारने एक समिती स्थापन करून तिच्या माध्यमातूनही याप्रकरणी चौकशी सुरू आली होती. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही कोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी दमानिया यांच्यावर खडसेंनी पातळी सोडून टिप्पण्या केल्या होत्या.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com