Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढणार? अध्यक्ष असलेल्या जिल्हा बँकेवर ईडीची धाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Hasan Mushrif Latest News, Hasan Mushrif News, Kolhapur Political News Updates
Hasan Mushrif Latest News, Hasan Mushrif News, Kolhapur Political News UpdatesSaam Tv

Hasan Mushrif News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ईडीने धाड टाकली आहे. माहितीनुसार, आज सकाळी ED चे अधिकारी जिल्हा बँकेत आले आणि सकाळपासूनच कागदपत्रांची पडताळणी सुरू केली आहे. (Maharashtra Political News)

Hasan Mushrif Latest News, Hasan Mushrif News, Kolhapur Political News Updates
New Income Tax Slab Budget 2023 : मोदी सरकारचं मध्यमवर्गीयांना मोठं 'गिफ्ट'; ७ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त

विशेष बाब म्हणजे गेल्या महिन्यातही मुश्रीफ यांच्यावर कोल्हापुरातील घरावर ईडीने धाड टाकली होती. या धाडीत २५ अधिकारी सामील झाले होते. सुमारे ११ तासांच्या चौकशीनंतर हे अधिकारी रिकाम्या हाताने परतले होते. मात्र, आज ईडीचे अधिकारी पुन्हा कोल्हापुरात आले. यावेळी त्यांनी मुश्रीफ हे अध्यक्ष असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरच धाड टाकून झाडाझडती सुरू केली आहे. (Latest Marathi News)

अचानक बँकेत ईडीचे अधिकारी घुसल्याने कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. त्यांनी संबधित कागदपत्रांची तपासणी सुरु केली. दरम्यान, ईडी अधिकारी बँकेत दाखल झाल्याचे कळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते बँकेच्या आवारात जमा झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा बँकेवर ईडी अधिकाऱ्यांनी धाड टाकल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणी पुन्हा वाढल्याचे मानले जात आहे.

Hasan Mushrif Latest News, Hasan Mushrif News, Kolhapur Political News Updates
Mukesh Ambani-Gautam Adani: मुकेश अंबानींनी गौतम अदानींना टाकलं मागे, सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत कोण कितव्या स्थानी?

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापुरातील घरावर माजी मंत्री आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी धाड टाकली होती. मात्र, त्यानंतर आज बुधवारी पुन्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेत धाड टाकली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com