ED Raid: छत्रपती संभाजीनगरात ईडीची छापेमारी, पाच पथकं विविध ठिकाणी दाखल; काय आहे प्रकरण?

शहरात गोरगरिबांसाठी ४० हजार घरे बांधताना महापालिकेने सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांच्या कामात नियमबाह्यपणे ठेकेदारावर निविदा दिल्याचा आरोप आहे.
ED News
ED NewsSaam Tv

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात शुक्रवारी ईडीने एकाच वेळी वेगवगेळ्या ठिकाणी छापेमारी केली. पंतप्रधान आवास योजनेतील घोटाळा प्रकरणी ईडीच्या पथकानेने सकाळी कासारी बाजार,आहिंसानगर, गारखेडा, कॅनाट परिसरात ही कारवाई सुरु केली. या कारवाईत २४ अधिकारी, कर्मचारी सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.

शहरात गोरगरिबांसाठी ४० हजार घरे बांधताना महापालिकेने सुमारे साडेचार हजार कोटी रुपयांच्या कामात नियमबाह्यपणे ठेकेदारावर कृपा दाखवल्याचा आरोप आहे. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणात ईडीकडे एक तक्रार दाखल झाली होती. या घोटाळ्यातील एका प्रकरणात सीटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

ED News
Crime News: थरारक! आधी महिलेची हत्या केली मग काळीज शिजवून खाल्लं

छत्रपती संभाजीनगर महापालिकेने सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत हर्सुल, पडेगाव, तिसगाव येथे १९.२२ हेक्टर क्षेत्रावर घरकुल योजना राबवण्यासाठी विकासक नियुक्तीसाठी १७ फेब्रुवारी २०२२ रोजी निविदा काढली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबवून ११ मार्च २०२२ रोजी पालिकेने मे समरथ कन्स्ट्रक्शन (जेव्ही) यांना या घरबांधणीसाठी इरादापत्र दिले.

मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याच योजनेसाठी महापालिकेला सुंदरवाडी, चिकलठाणा या ठिकाणी आणखी तीन भूखंड देण्यात आले. या ठिकाणी नव्याने निविदा प्रक्रिया न राबवता महापालिकेने तडजोडी अंतर्गत याच कंत्राटदाराला या नव्या ठिकाणीही घर बांधण्याची कामे दिली. या कराराअंतर्गत संबंधित ठेकेदाराने हुर्सल, पडेगाव, तिसगाव, सुंदरवाडी आणि चिकलठाणा या सात ठिकाणी ३९ हजार ७६० सदनिका बांधण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला.

ED News
Dombivli News: मधुबन टॉकीज परिसरात राडा, Ambulance चालकास बेदम मारहाण; फेरीवाले पाेलिसांच्या ताब्यात

राज्य आणि केंद्र सरकारने नंतर याला मान्यता दिली. या कामाचे सर्व नियम आणि धोरणे पायदळी तुडवून पालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया न राबवता केवळ ठेकेदाराच्या मर्जीनुसार प्रकल्पाची आखणी केल्याची आणि त्यात मोठा घोटाळा झाल्याची बाब उघडकीस आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेशही दिले होते.

विशेष म्हणजे या प्रकल्पातील एकूण १२६ हेक्टर जागेपैकी ९० हेक्टर जागेवर अतिक्रमण , टेकडी, वन खदान अशी विविध आरक्षण आहेत. त्यामुळे बांधकाम करता येणे शक्य नाही. त्यामुळे ३९ हजाराहून अधिक घरांचा आराखडा मंजूर केला, मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी १५ ते १७ हजारच घर बांधता येऊ शकतात, असं अहवालात पुढे आल्याचं कळतंय. त्यामुळे फक्त काही लोकांना लाभ करून देण्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू असल्याचा बोलला जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com