अर्जुन खोतकरांच्या अडचणी वाढणार? घरावर ईडीचा छापा

12 जणांचे पथक खोतकर यांच्या घरी दाखल
अर्जुन खोतकरांच्या अडचणी वाढणार? घरावर ईडीचा छापा
अर्जुन खोतकरांच्या अडचणी वाढणार? घरावर ईडीचा छापाSaam Tv

जालना - शिवसेनेचे नेते अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांच्या घरी ईडीने (ED) छापा टाकला आहे. खोतकर यांनी जालनामधील (Jalna) साखर कारखान्याच्या विक्रीमध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) केला होता. सकाळीच 8.30 वाजल्यापासून ईडीचे पथक खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यात दाखल झाले. आज झालेली ही छापेमारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

12 जणांचे पथक खोतकर यांच्या घरी दाखल झाले होते. यावेळी अर्जून खोतकर घरीच होते, अशी माहिती समोर आली आहे. अर्जुन खोतकर हे जालन्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. त्यामुळे जालन्यामधील कृषी उत्पन्न बाजार समितीतमध्ये देखील ईडीकडून तपासणी करण्यात येत आहे. आज सकाळी 8.30 वाजता ईडीचे पथक खोतकरांच्या भाग्यनगर येथील बंगल्यामध्ये पोहोचले. तेंव्हापासून अजूनही तपासणी सुरु आहे. कोणालाही घरामध्ये प्रवेश दिला जात नसल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com