Hasan Mushrif: मोठी बातमी! 30 तासांपासून हसन मुश्रीफ नॉट रिचेबल; ईडी कार्यालयात वकिल मांडणार बाजू

दोन दिवसांपूर्वी ईडीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, कागलमधील घरावर धाड टाकली होती.
Ed Raid On Hasan Mushrif Home
Ed Raid On Hasan Mushrif HomeSaamtv

Hasan Mushrif ED Raid: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) समन्स बजावण्यात आलं आहे. आज त्यांना मुंबईमधील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. मात्र मुश्रीफ गेल्या 50 तासांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. आता त्यांच्या गैरहजेरीत वकिल बाजू मांडणार आहेत.

Ed Raid On Hasan Mushrif Home
Oscar Awards 2023: RRR ने इतिहास रचला! 'नाटू नाटू' गाण्याने पटकावला ऑस्कर अवॉर्ड; देशासाठी अभिमानाचा क्षण..

दोन दिवसांपूर्वी इडीने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, कागलमधील घरावर धाड टाकली होती. या धाडीत ईडीने मुश्रीफ यांच्या घराची तब्बल ९ तास चौकशी केली होती. यावेळी अधिवेशनामुळे हसन मुश्रीफ मुंबईला असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ईडीने तिसऱ्यांदा छापेमारी केल्यानंतर ते गेल्या 50 तासांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे.

पक्षाकडून हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र मुश्रीफ यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मुश्रीफ संपर्काबाहेर असल्याने मुश्रीफ गेले कुठे? असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.

Ed Raid On Hasan Mushrif Home
Weather Updates Today : राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट; या भागात वादळी पावसाची शक्यता

दरम्यान, ईडीकडून मुश्रीफांच्या निवासस्थानी शनिवारी दिवसभरात कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यांनी कोणतीही कागदपत्रे यावेळी सोबत नेलेली नाहीत. मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा तसेच मुलगा आबिद मुश्रीफ यांच्यासह पाज जणांचा जबाब घेतल्याची माहिती आहे. (Maharashtra Politics)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com