Beed News : बीड-अहमदनगर महामार्गावर तेलाचा टँकर उलटला; नागरिकांनी हंडेच भरले!

नागरिकांनी गर्दी करत मिळेल तसे तेल लुटले आहे.
Beed Accident News
Beed Accident NewsSaam TV

बीड: आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बीड अहमदनगर (Beed) महामार्गावरील खाद्यतेलाचा (Edible Oil) टॅंकर पलटी झाला आहे. पलटी झालेल्या तेलाच्या टॅंकर मधील तेलावर नागरिकांनी डल्ला मारलाय. हे तेल नेण्यासाठी, नागरिकांनी गर्दी करत मिळेल तसे तेल लुटले आहे. (Beed Todays News)

Beed Accident News
Dombivli: नशेत चालवली कार; सात वाहनांना धडक २ रिक्षांचा चक्काचूर

प्राप्त माहितीनुसार, अंभोरा ते वाघळूज दरम्यान असलेल्या घाटात अहमदनगरहून जामखेडच्या दिशेने जाणाऱ्या टॅंकर ला अपघात झाला. रस्त्यावरून टॅंकर खाली गेल्याने टँकर पलटी झाला आणि चालक बेशुद्ध पडला. टॅंकर पलटी झाल्याने टॅंकर मधून खाद्यतेलाचा गळत होते. दरम्यान, टॅंकर उलटल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. (Beed Accident News)

Beed Accident News
Latur: मुसळधार ढगफुटी सदृश्य पाऊस; लाखो हेक्टरवरील पिके गेली वाहून

सायंकाळी हा अपघात झाल्यानं अंधाराचा फायदा घेऊन नागरिकांनी मिळेल त्या पद्धतीने ड्रम, हांडे, डब्बे घेऊन खाद्यतेलाचा मिळेल तसे लुटण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या टॅंकर भोवती मोठी गर्दी झाली होती. दरम्यान रात्री उशिरा टॅंकर उभा करण्यात आला.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com