दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण मिळाले नाही, हताश होऊ नका, शिक्षणमंत्री म्हणाल्या...

दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांवर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत.
Varsha Gaikwad
Varsha Gaikwad Saam Tv

मुंबई : कोरोनामुळे उद्भवलेल्या (corona) असामान्य परिस्थितीतही विद्यार्थ्यांनी मोठ्या जिद्दीने, धैर्याने, संयमाने व परिश्रमाने अभ्यास पूर्ण करत (ssc exam) दहावीची परीक्षा दिली. शिक्षणाप्रती त्यांच्या या समर्पणभावाला सलाम. या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही, त्यांनी हताश न होता पुन्हा नव्या उमेदीने अभ्यासाला लागावे व यश संपादन करावे, असं आवाहन करत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी विद्यार्थ्यांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

Varsha Gaikwad
अदानींच्या वाहनाचे सारथ्य; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, तर चर्चा होऊद्यात!

यावेळी माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, दाहवीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळाले नाहीत, त्यांना श्रेणी किंवा गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेंतर्गत दोन परीक्षांमध्ये पुन्हा प्रविष्ट होता येईल. मार्च 2022 च्या परीक्षेस प्रथमच नियमित विद्यार्थी म्हणून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना (एकाच वेळी सर्व विषय घेवून प्रविष्ट होणाऱ्या) जुलै-ऑगस्ट 2022 व मार्च 2023 च्या परीक्षेस श्रेणीसुधारसाठी प्रविष्ट होण्याच्या दोन संधी देण्यात येतील, असेही गायकवाड यांनी सांगितले.

या परीक्षेत पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,68,977 नियमित विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी 15,21,003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 6,50,779 विद्यार्थी प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, 5,70,027 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर 2,58,027 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.हा निकाल आनंददायक व आशादायक आहे, असंही गायकवाड म्हणाल्या आहेत.

Varsha Gaikwad
मुंबईत कोरोनाचा विळखा घट्टच, आजच्या आकडेवारीमुळं नागरिकांना दिलासा नाहीच

राज्यातील 12,210 शाळांचा आणि 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांची कोकण विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी 99.27 अशी सर्वाधिक असून सर्वांत कमी उत्तीर्णतेची टक्केवारी नाशिक विभागाची 95.90 टक्के इतकी आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 97.96 असून मुलांची 96.06 एवढी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता.तर मार्च 2020 मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्णतेची टक्केवारी 95.30 अशी होती. म्हणजेच मार्च-एप्रिल 2022चा निकाल मार्च 2020 च्या तुलनेत 1.64 टक्क्यांनी वाढला आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com