पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर

पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख जाहीर
scholarship exam decleared

सातारा : काेविड 19 चा वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली हाेती. ही परिक्षा आता येत्या आठ ऑगस्टला घेण्यात येणार असल्याचे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. (education-minister-varsha-gaikwad-tweets-fifth-eighth-scholarship-exams-date-declare-sml80)

काेविड 19 च्या मार्गदर्शक तत्वांचे आणि नियमांचे पालन करून ही परीक्षा होणार असल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. दरम्यान इयत्ता पाचवी आणि आठवीत असलेले विद्यार्थी आता पुढील वर्गात गेले असले तरी ही परीक्षा देता येणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रतिवर्षी घेण्यात येते. काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे सन 2020-21 ची शिष्यवृत्ती परीक्षा सातत्याने पुढे ढकलण्यात येत हाेती. ही परीक्षा व्हावी अशी मागणी जाेर धरु लागल्याने 23 मे 2021 ही तारीख निश्चित करण्यात आली हाेती. दरम्यानच्या काळात काेविड 19 चा प्रादुर्भाव वाढला आणि 23 मे ला हाेणारी परिक्षा शिक्षण विभागाने रद्द केली.

आता महाराष्ट्रातील काेविड 19 ची लाट आटोक्यात आली असल्याने काेविड 19 च्या नियमांचे पालन करण्याच्या अटीवर शालेय शिक्षण विभागाने ही परीक्षा आठ ऑगस्टला घेण्याबाबतच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने परीक्षा परिषदेला दिल्या आहेत scholarship exam decleared.

राज्यातील ४७ हजार ४६२ शाळांमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. ही परीक्षा घेण्यासाठी राज्यात सुमारे पाच हजार ६८७ इतकी केंद्र आहेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com