अभ्यासाचं गाव तडवळे : जिल्ह्यातील पाहिलं अन् राज्यातील दुसरं !

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तडवळे येथे 'अभ्यासाचं गाव' हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
अभ्यासाचं गाव तडवळे : जिल्ह्यातील पाहिलं अन् राज्यातील दुसरं !
अभ्यासाचं गाव तडवळे : जिल्ह्यातील पाहिलं अन् राज्यातील दुसरं !विश्वभूषण लिमये

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर Solapur जिल्ह्यातील बार्शी Barshi तालुक्यातील तडवळे येथे 'अभ्यासाचं गाव' Abhyasach Gaon हा उपक्रम राबवण्यात येत आहे. तडवळे Tadwale ग्रामस्थांचा हा उपक्रम हळूहळू शैक्षणिक विभागाला देखील दखल घेण्यास भाग पाडू लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पहिले आणि राज्यातील दुसरे अभ्यासाचे गाव म्हणून याच कौतुक होत आहे.

हे देखील पहा-

कोरोनाकाळात Corona विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ लागल्याने हा उपक्रम सुरु करण्यात आला होता. मात्र आता या उपक्रमाने शालेय विद्यार्थ्यांसोबत जेष्ठ नागरिक, शेतकरी, व्यावसायिक अशा सर्व स्तरातील नागरिकांना सामाजिक आणि शैक्षणिक ज्ञानाचे धडे मिळतं आहेत.

या उपक्रमामुळे गावचा चेहरा मोहरा बदलला असून भिंतींवर शैक्षणिक अभ्यासक्रम सप्तरंग संगतीत चितारला आहे. त्यामुळे बालचमूंना खेळत बागडत शिक्षण घेता येत आहे. या उपपक्रमाद्वारे अंगणवाडी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भित्तिचित्रकांद्वारे शिक्षण दिले जातं आहे.

अभ्यासाचं गाव तडवळे : जिल्ह्यातील पाहिलं अन् राज्यातील दुसरं !
बुलढाण्यात दोन बोकडांची जोरदार चर्चा; दोघांनाही लाखोंची किंमत..!

गावातील भिंतींवर शैक्षणिक,सामाजिक,ऐतिहासिक आणि नैसर्गिक संदेश रेखाटून याद्वारे शिक्षण आणि जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

एकीकडे आजपासून जिल्ह्यातील बहुतांश शाळा या नव्याने सुरु होणार आहेत तर दुसरीकडे कोरोनाकाळात सुद्धा गावातील तीन अंगणवाड्या,एक जिल्हा परिषद शाळा,एक वस्ती शाळा आणि एका हायस्कुलमध्ये या उपक्रमातून शिक्षण जातं होत हे विशेष.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com