सामाजिक सलोख्याचा संदेश देणारी ईद; हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र घेतला शीरखुर्म्याचा स्वाद

मशिदीमध्ये हिंदू-मुस्लिम धर्मियांनी एकत्र येऊन साजरी केली ईद
सामाजिक सलोख्याचा संदेश देणारी ईद; हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र घेतला शीरखुर्म्याचा स्वाद
सामाजिक सलोख्याचा संदेश देणारी ईद; हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र घेतला शीरखुर्म्याचा स्वादSaamTVNews

लातूर : सध्या राज्यात मुस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थळ असणाऱ्या मशिदींवरील भोंगे उतरवण्यावरून वातावरण तापले असतानाच, दुसरीकडे गावात हिंदू-मुस्लिम (Hindu-Muslim) एकोपा राहावा म्हणून लातूर (Latur) जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील साकोळ जवळगा या गावातील सगळ्याच जाती धर्मातील लोकांनी एकञ येऊन मस्जिदमध्ये ईद (Ramdan Eid) साजरी करत सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.

हे देखील पाहा :

मुस्लिम बांधवांनीही घरामध्ये ईद साजरी न करता गावातीलच मशिदीमध्ये एकत्र येऊन अख्ख्या गावासह ईद साजरी केली. साकोळ जवळगा गावाचे सरपंच हनुमंत बिराजदार, जि.प. सदस्य प्रशांत पाटील, वामनराव पाटील, विजयकुमार पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष शेषराव पाटील माजी सरपंच रमेश वाघ, माजी सभापती संजीव रेड्डी आदी व्यक्तींनी सहभाग नोंदविला.

सामाजिक सलोख्याचा संदेश देणारी ईद; हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र घेतला शीरखुर्म्याचा स्वाद
Raj Thackeray Latest Update: राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल

यावेळी मुस्लिम बांधवांनी शीरखुर्मा आणि गुलगुले आदी खाद्यपदार्थांची मेजवानी अख्ख्या गावाला दिली. अनोख्या पद्धतीने हिंदू-मुस्लिम बंधुभाव जपत हि ईद साजरी करण्यात आली. विविध जातीधर्माच्या लोकांनी अख्खा गाव एकत्रितपणे ईद साजरी करण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com