MLA Ramesh Bornare : शिंदे गटाच्या आमदारानं पोलिसांशी घातली हुज्जत, बाचाबाचीचा VIDEO व्हायरल

शिंदे गटातील आणखी एका आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
MLA Ramesh Bornare Viral Video
MLA Ramesh Bornare Viral VideoSaam TV

नवनीत तापाडिया, साम टीव्ही

MLA Ramesh Bornare Viral Video : एकीकडे आमदार संतोष बांगर यांनी महाविद्यालयातील प्राचार्यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच, आता दुसरीकडे शिंदे गटातील आणखी एका आमदाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हे आमदार महोदय थेट पोलिसांनाच अरेरावी करताना दिसून येत आहे.  (Latest Marathi News)

MLA Ramesh Bornare Viral Video
Santosh Bangar News: आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत; प्राचार्यांना मारहाणीनंतर संतोष बांगर यांची प्रतिक्रिया

त्यामुळे शिंदे गटातील (Eknath Shinde) आमदारांना कायद्याचा धाकच उरला नाही का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांचा हा व्हिडीओ असून या व्हिडीओत ते पोलिसांसोबत हुज्जत घालताना दिसून येत आहे.

नेमकं काय घडलं?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज औरंगाबाद (Aurangabad) दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विभागीय आयुक्तालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित झाले होते. दरम्यान शिंदे गटातील आमदार रमेश बोरनारे यांची गाडी पोलिसांनी अडवली.

यावेळी माझी गाडी का नाही जाऊ दिली? असा प्रश्न करत शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी पोलिसांसोबत हुज्जत घातली. यावेळी औरंगाबादचे पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी घटनास्थळी दाखल होत प्रकरण मिटवलं. मात्र, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Maharashtra Political News)

संतोष बांगर यांची प्राचार्यांना मारहाण

शिंदे गटातील आमदारांची दिवसेंदिवस मुजोरी वाढतच चालली आहे. काही दिवसांपूर्वी आमदार सदा सरवणकर यांचा मुंबईत हवेत गोळीबार करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावरून टीकेची झोड उठली होती.

आता शिंदे गटातील आमदार बांगर (Santosh Bangar)  यांनी हिंगोलीतील एका प्राचार्यांनाच मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हिंगोली शहराजवळ असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्राचार्य अशोक उपाध्याय यांना आमदार संतोष बांगर यांनी शिवीगाळ करत मारहाण केली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com