असं वागणं चुकीचे, धाेकादायक आहे : एकनाथ शिंदे

या मेळाव्यास खासदार संजय जाधव, आमदार राहूल पाटील यांच्यासह शिवसैनिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.
असं वागणं चुकीचे, धाेकादायक आहे : एकनाथ शिंदे
Eknath Shinde

परभणी : राज्यातील जनतेचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्याचे काम सरकारचे आहे. त्याला सहकार्य करण्याचे काम विराेधी पक्षाने करणे आवश्यक असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मंत्री शिंदे हे परभणी जिल्हा दाै-यावर आले हाेते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अमरावती येथील हिंसाचाराच्या घटनेवर नाराजी व्यक्त केली. eknath shinde amravati violence nanded malegoan

Eknath Shinde
दातृत्व; रिक्षाचालकास महिलेने दिली एक कोटी रुपयांची संपत्ती

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील अक्षदा मंगल कार्यालय येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मंत्री शिंदे यांनी उपस्थितांना आगामी निवडणुकीविषयी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी गरजू, गरीब रुग्णांकरिता तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. या मेळाव्यास खासदार संजय जाधव, आमदार राहूल पाटील यांच्यासह शिवसैनिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

दरम्यान मंत्री शिंदे यांना गडचिरोली येथे जायचे असल्याने त्यांनी परभणीचा दौरा आटोपता घेतला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अमरावती येथे घडलेल्या हिंसाचार घटनेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्री शिंदे म्हणाले कायदा व सुवव्यस्था राखण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे. त्रिपुरातील काही घटनांचे पडसाद राज्यात उमटविणे हे चुकीचे आहे. राज्यातील जनतेची आणि मालमत्तेचे रक्षण करण्याचे काम सरकारचे आहे. त्याला देखील सहकार्य करण्याचे काम विराेधी पक्षाने करणे आवश्यक असल्याचे मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com