Video : बाळासाहेबांनाही वाटत असेल आपला मुलगा बिघडला; शिंदे गटातील नेत्याची बोचरी टीका

"उद्धव ठाकरे हे आपण बाळासाहेबांचा मुलगा आहे असं वारंवार सांगतात"
Uddhav thackeray
Uddhav thackeray saam tv

रत्नागिरी - शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच रत्नागिरीत शिंदे गटाचा पहिला मेळावा पार पडला. यावेळी शिंदे गटातले नेते आणि शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) वरुन बघत असतील आणि सांगत असतील की माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या नादाला लागून बिघडला आहे. सोनिया गांधींच्या नादाला लागून उद्धव ठाकरे बिघडला आहे. माझे विचार घेऊन तू पुढं चालं माझे आशिर्वाद तुला आहेत. हे बाळासाहेब वरुन सांगत असतील अशी बोचरी टीका रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. (ramdas kadam slams uddhav thackeray)

Uddhav thackeray
Dasara Melava: शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा होणार? आज निर्णय होण्याची शक्यता

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना आधी लक्ष्य केल्यानंतर रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना थेट लग्न करुन पाहण्याचा सल्ला देखील जाहीर सभेत दिला आहे. शिंदे गटाने आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी दापोलीत मेळावा घेतला होता. या मेळाव्यात रामदास कदम बोलत होते.

रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना लग्नाचा सल्ला दिला. आंबादास तुम्ही आदित्य ठाकेरी यांना सांगितलं पाहिजे पहिल्यांदा लग्न करुन बघ. मग संसार कसा ते कळेल. नुसती दाढी वाढवून काय फायदा ? म्हणजे खोके काय असतील ते कळेल,” असं रामदास कदम म्हणाले. उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादीची भांडी घासतायत आणि त्यांचा मुलगा टुणटुण टुणटुण खोका, खोका करत उड्या मारत आहेत. असा टोला कदम यांनी लगावला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com