सहाव्या दिल्लीवारीत मंत्रिमंडळ विस्तारावर शिंदे-भाजप यांचे एकमत, मंत्रिमंडळाचा विस्तार पक्का?

सरकार स्थापन होऊन एक महिना झाला, तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.
Devendra Fadnvis, Eknath Shinde
Devendra Fadnvis, Eknath ShindeSaam Tv

औरंगाबाद: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सरकार स्थापन होऊन एक महिना उलटून गेला आहे, पण तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली दौरे सुरू आहेत. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल मुख्यमंत्री शिंदे पुन्हा दिल्लीसाठी रवाना झाले होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Eknath Shinde Latest News)

Devendra Fadnvis, Eknath Shinde
मोठी बातमी! अविनाश भोसले यांचे हेलिकॉप्टरही CBIकडून जप्त

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सकाळी पाच वाजता औरंगाबाद विमानतळावर आगमन झाले. आज औरंगाबाद दौऱ्यातील नियोजित कार्यक्रमांना मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. काल दुपारी मुख्यमंत्री दिल्लीसाठी रवाना झाले होते. दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे यांची बैठक झाली असल्याचे सागंण्यात येत आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

येणाऱ्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. तब्बल एक महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागणार आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाच्या शपथविधीबाबत काही बोलणार का?, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.(Eknath Shinde Latest News)

Devendra Fadnvis, Eknath Shinde
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या घरी ईडीची टीम दाखल

...तर शिंदे गटातील ४ आमदार शिवसेनेत जाणार?

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे गट आणि भाजप एकत्र येत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सत्ता स्थापन करुन एक महिना झाला तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.

यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन आता नवी माहिती समोर आली आहे. शिंदे गटातील २२ ते २३ आमदारांनी मंत्रिपदाची मागणी केली असल्याचे बोलले जात आहे, तर मंत्रिपद मिळाले नाही तर तीन ते चार आमदार शिवसेनेत परत जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गट अडचणीत येऊन सरकार कोसळू शकते असं बोलले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com