
ठाणे : ठाण्याची शिवसेना (Shivsena) आणि शिवसेनेचे ठाणे (Thane) हे समीकरण ठाण्याच्या राजकारणात बिंबवणारे शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे (Anand Dighe) यांचं कार्यलय. म्हणजेच आनंद मठ. या मठाने शिवसेनेचे अनेक चढ उतार पाहिलेत. अनेक निवडणुकांची रणनीती आनंद मठातून करण्यात आली. एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांचे शिष्य ,शिंदे यांनी देखील दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली या मठातून राजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली. एकनाथ शिंदे शिवसेनेवर नाराज असून त्यांच्यासह जवळपास ३० ते ३५ आमदार नॉटरिचेबल झाल्याने शिवसेनेनेच गोटात एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या या नाराजीनाट्यानंतर आनंद मठात शांतता पाहायला मिळत आहे. (Maharashtra Political Crisis News In Marathi)
शिवसेना वरिष्ठ नेत्यांकडून एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. सकाळपासून हा सर्व प्रकार सुरू असताना आनंद मठात मात्र शांततेचं वातावरण आहे. या कार्यालयात शिवसैनिक आहेत. मात्र घडलेल्या प्रकारावर त्यांच्या विश्वास बसत नाही. एकनाथ शिंदे शिवसेना सोडून कुठं जाणार नाहीत अशी चर्चा सैनिकांमध्ये आहे .शिवसैनिक आपल्या मोबाईल मध्ये या बाबतचे अपडेट्स पाहत आहेत. मात्र कुणीही कॅमेरा समोर बोलण्यास तयार नाही. एकूणच शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
महाविकास आघाडी सरकार धोक्यात ?
एकीकडे महाविकास आघाडी सरकार वाचवण्यावरून शिवसेना चहुबाजूंनी घेरली गेली असतानाच ही नवी माहिती समोर आली आहे. अशातच मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील 30 हून अधिक आमदारांनी राजीनामा दिला तर, महाराष्ट्रात खरोखरच राजकीय भूकंप होऊ शकतो. कारण, एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देणं म्हणजे शिवसेनेवरची नाराजी आणखी तीव्रपणे व्यक्त करणं. याचाच अर्थ शिवसेनेनं केलेली शिष्टाई परिणामकारक ठरली नाही आणि कुठल्याही क्षणी महाविकास आघाडी सरकार धोक्यात येऊ शकतं, असं बोललं जात आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.