भाविकांनाे! एकवीरा देवीचे दर्शनास निघालात? हे वाचा

ekvira devi temple
ekvira devi temple

मावळ : मावळ येथील पावसाचा जोर कमी होईपर्यंत कार्ला लेणी आणि एकवीरा देवीचे ekvira devi temple दर्शन नागरिकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिले आहेत. काही दिवसांपूर्वी एकवीरा देवीचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. मंगळवारी (ता.२१) झालेल्या मुसळधार पावसाने गडाचे काही दगड सैल होऊन पडले. त्याचे वृत्त सर्व प्रथम साम टिव्हीने दिले. या वृत्ताची दखल घेत मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ekvira-devi-aai-darshan-karla-caves-closed-by-tahshildar-madhusudan-barge-maval-pune-news

ekvira devi temple
IPL ला काेराेनाचे ग्रहण; SRH चा नटराजन पाॅझिटीव्ह

तहसीलदार बर्गे यांनी कार्ला लेणी परिसराची पाहणी केल्यानंतर पुण्याच्या जिल्हाधिक-यांशी संवाद साधत त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. डोंगरावरून पाणी लेणीच्या तोंडाजवळ पडू लागले आहे. या वेगाने पडणार्‍या पाण्यासोबत डोंगराचे सैल झालेले दगड व भिंतीचे दगड देखील पडू लागल्याने हा परिसर धोकादायक बनला आहे असे तहसीलदार बर्गे यांनी नमूद केले.

भाविकांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीने या लेणीचा परिसरात पावसाचा जोर कमी होईपर्यंत लेणी परिसरात आणि एकवीरा आईचे दर्शनाची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत तहसीलदार मधूसूदन बर्गे म्हणाले सध्या या परिसरात पाऊस वाढला आहे. नागरिकांची सुरक्षितता महत्वाची आहे. यामुळे तात्पूरत्या स्वरुपात पर्यटकांनी, भाविकांनी दिलेल्या आदेशाचे पालन करावे.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com