Buldhana: संग्रामपूर व मोताळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक

संग्रामपूर मध्ये नगराध्यक्ष हे पद अनुसूचित जाती साठी राखीव असून प्रहार जनशक्ती तर्फे उषा सोनोने तर महाविकास आघाडी तर्फे भारत बावस्कर हे निवडणूक लढविणार आहेत.
Sangrampur Nagar Panchyat
Sangrampur Nagar Panchyatसंजय जाधव

बुलढाणा - जिल्ह्यातील संग्रामपूर व मोताळा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षांची आज निवड होणार आहे. आजच्या निवडणूकच (Election) वैशिष्ट्य म्हणजे बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर नगर पंचायतीत पहिल्यांदाच आपल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार रिंगणात उभे होते आहे आणि १७ पैकी १२ जागा जिंकत संग्रामपूर नगर पंचायतीवर एकहाती सत्ता मिळविली आहे. तर मोताळा नगर पंचायतीत काँग्रेसने (Congress) १७ पैकी १२ जागा जिंकत सत्ता कायम ठेवली आहे.

हे देखील पहा -

मोताळा नगर पंचायतीत काँग्रेस तर्फे माधुरी देशमुख यांचा एकच उमेदवारी अर्ज असल्याने आजची निवडणूक औपचारिक ठरणार आहे तर संग्रामपूर मध्ये नगराध्यक्ष हे पद अनुसूचित जाती साठी राखीव असून प्रहार जनशक्ती तर्फे उषा सोनोने तर महाविकास आघाडी तर्फे भारत बावस्कर हे निवडणूक लढविणार आहेत. साधारणतः ४.०० वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com