नागवडे कारखान्याची निवडणूक लागली, बापूंच्या वारसांपुढे आव्हान

नागवडे कारखान्याची निवडणूक लागली, बापूंच्या वारसांपुढे आव्हान
अनुराधा नागवडे

अहमदनगर : नागवडे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अखेर होणार आहे. २० सप्टेंबरला ही प्रकिया सुरू होणार आहे. यावेळीही पात्र सगळ्या सभासदांना मतदानाची संधी मिळणार असल्याने, पुन्हा एकदा टोकाचा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. कारखाना संस्थापक शिवाजीराव नागवडे (बापू) यांच्याशिवाय होणाऱ्या या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांविरुद्ध जवळच्याच लोकांनी बंड पुकारल्याने निवडणुकीत रंगत येणार आहे. या सगळ्यात आमदार बबनराव पाचपुते गटाचीच भूमिका महत्त्वाची मानली जाते.

पंधरा महिन्यांची मुदतवाढ मिळालेल्या संचालक मंडळाला आता निवडणुकीची तयारी सुरू करावी लागणार आहे. सहकार पोटनियमांचा आधार घेत मध्यंतरी कारखाना व्यवस्थापनाने बावीस हजार सभासदसंख्या निम्म्यावर आणल्याने मोठा गोंधळ उडाला होता. निम्मे सभासद मतदानाला मुकणार, असेच चित्र होते. Election of Nagwade Sugar Factory announced

अनुराधा नागवडे
भंडारदरापाठोपाठ निळवंडे काठोकाठ, प्रवरेला पूर

आता पुन्हा नव्याने मतदारयाद्या तयार होणार असल्याने, यात साधारण बावीस हजार सभासद मतदानास पात्र होतील. ही माहिती कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी दिली. येत्या २० सप्टेंबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होऊ शकते.

दरम्यान, बापूंच्या निधनानंतर होणारी ही पहिली निवडणूक सत्ताधारी गटाला सोपी जाणार नसल्याचे भाकीत आहे. बापूंचे पुत्र राजेंद्र नागवडे यांच्या कारभारावर टोकाची टीका करीत उपाध्यक्ष राहिलेले केशवराव मगर बाहेर पडले आहेत. त्यांच्यासोबत संचालक अण्णासाहेब शेलार, माजी उपाध्यक्ष जिजाबापू शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले यांच्यासह समविचारी प्रमुख असल्याने नागवडे यांना कडवे आव्हान आहे. विरोधकांनी नागवडे यांच्या कारभारावर अनेक गैरव्यवहारांचे आरोप केल्याने निवडणूक टोकाची होणार, याची झलक दिसून आली आहे.

या सगळ्या राजकारणात आता आमदार पाचपुते यांचा गट काय भूमिका घेतो, याची सगळ्यांना उत्सुकता आहे. कारखान्याच्या लढाईत यापूर्वी नागवडे विरुद्ध पाचपुते अशीच लढाई होत आली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत राजेंद्र नागवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत पाचपुते यांचा प्रचार केला आहे. तथापि, त्यानंतर त्यांनी पुन्हा काँग्रेसशी जुळवून घेतले. आता विधानसभेला जी मदत झाली त्याची परतफेड पाचपुते कसे करणार हे महत्त्वाचे आहे.

विखेपाटील यांच्या भूमिकेकडे लक्ष

नागवडे कारखाना निवडणुकीत विखेपाटील यांना मानणारे बहुतेक कार्यकर्ते नागवडे यांच्याविरोधात दंड थोपटून आहेत. खासदार डॉ. सुजय विखेपाटील निवडणुकीत लक्ष घालण्याची शक्यता कमी असली तरी त्यांच्या कार्यकर्त्यांना ते काय कानमंत्र देतात यावर कारखाना निवडणुकीचे वातावरण तापणार आहे. Election of Nagwade Sugar Factory announced

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com