Baramati: भाजपला पराभव दिसतोय म्हणूनच निवडणुका लांबणीवर; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल

ज्या झाडाला आंबे लागतात त्याच झाडाला लोकं दगडं मारतात, म्हणूनच सातत्याने बारामती टार्गेट होत आहे.
Supriya Sule, Devendra Fadnsvis
Supriya Sule, Devendra FadnsvisSaam Tv

बारामती: विविध सर्वेंमधून भाजपला निवडणुकांमध्ये पराभव दिसतोय म्हणूनच महानगरपालिका निवडणुका सातत्याने लांबणीवर टाकल्या जात आहेत. शिवाय या प्रशासक राजमध्ये जनता वाऱ्यावर सोडली जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शिंदे-भाजप सरकारवर केली आहे. आज त्या बारामती (Baramati) दोऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होत्या.

यावेळी त्या म्हणाल्या, मी नेहमीच बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर येते, आजही २३ गावातील कचरा प्रश्नावर आंदोलन करण्यासाठी आले आहे. पत्रकारांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्या बारामती (Baramati) दौऱ्याबाबत सुळेंना प्रश्न विचारला असता सुळे म्हणाल्या, मी पहिलंच सांगितलं आहे की, त्यांचं बारामती मतदारसंघात स्वागत आहे.

पाहा व्हिडीओ -

ज्या झाडाला आंबे लागतात त्याच झाडाला लोकं दगडं मारतात, म्हणूनच सातत्याने बारामती टार्गेट होत आहे. पण जनता सुजान आहे, भाजपचा हा खडखडाट बारामतीकरांना चांगला समजतोय, आम्ही आपलं विकासाची कामं सुरूच ठेवणार असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या. दरम्यान, शिंदे गटातील शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना ईडीने खरंच क्लोजर रिपोर्टनुसार दिलासा दिला असेल आणि सरनाईक कुटुंबीय निर्दोष असेल तर, भाजपने जाहीर माफी मागावी.

Supriya Sule, Devendra Fadnsvis
भरवस्तीमधील घरात सापडली जनावरांची ५३ शिर; पोलिसांच्या छाप्यात समोर आली धक्कादायक माहिती

कारण या प्रकरणाचा घटनाक्रम समजून घेतला तर हे उघड उघड ब्लॅकमेलिंग असल्याचं दिसतं आहे. हे ईडी सरकार विरोधकांवर दडपशाही करतं आहे. मात्र त्यांना वेदांताचा प्रकल्प वाचवता आला नाही आणि उलट विरोधकांवरच आरोप करत सुटले आहेत अशी टीकाही सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com