Electricity Bill : तर राज्य अंधारात जाऊ शकतं:  नितीन राऊत
Electricity Bill : तर राज्य अंधारात जाऊ शकतं: नितीन राऊत

Electricity Bill : तर राज्य अंधारात जाऊ शकतं: नितीन राऊत

फडणवीस सरकारच्या काळातच वीजबील थकबाकी राहिली होती. अशातच ठाकरे सरकार येताच काही दिवसातच चक्रीवादळं, अतिवृष्टी, महापूर अशी संकटे एकापाठोपाठ आली.

रश्मी पुराणिक

कोरोना महामारीमुळे (Corona epidemic) थकीत वीजबिलाची वसुली करता आली नाही. वीजबिल थकबाकीची वसुली वेळेवर झाली नाही तर राज्य अंधारात जाऊ शकतं, अशी चिंता राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी केली आहे. राज्यात ७९ हजार कोटींपर्यंत वीजबिलाची थकबाकी पोहचली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या (CM Uddhav Thackeray) उपस्थितीत आज सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यावेळी भाजपा सरकारने थकबाकीचा वाढवल्यामुळे महावितरणावर ही वेळ आली असा असा आरोप नितीन राऊत यांनी केला आहे.

बैठकीनंतर मंत्री राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात ठाकरे सरकार स्थापन झाल्यानंतर काही दिवसातच कोरोनाचे संकट राज्यापुढे उभे राहिले. त्यातच फडणवीस सरकारच्या काळातच वीजबील थकबाकी राहिली होती. अशातच ठाकरे सरकार येताच काही दिवसातच चक्रीवादळं, अतिवृष्टी, महापूर अशी संकटे एकापाठोपाठ आली. या संकटात महावितरणच्या आर्थिक स्थितीबाबत विश्लेषण मुख्यमंत्र्यांना करण्यात आलं आहे.

हे देखील पहा-

राज्यातील थकीत वीजबिल

- राज्यात एकूण ग्राहक संख्या 2 कोटी 87 लाख

- घरगूती ग्राहक 215 लाख 13 हजार. एकूण ग्राहक संख्येच्या 75 टक्के व एकूण वीज वापर 20 टक्के

- कृषी

ग्राहक 43 लाख 44 हजार. एकूण ग्राहक संख्येच्या 15 टक्के व एकूण वीज वापर 31 टक्के

औद्योगिक ग्राहक 4 लाख 51 हजार. एकूण ग्राहक संख्येच्या 2 टक्के व एकूण वीज वापर 38 टक्के

वाणिज्य ग्राहक 20 लाख 75 हजार. एकूण ग्राहक संख्येच्या 7 टक्के व एकूण वीज वापर 5 टक्के

पथदिवे ग्राहक 1 लाख 2 हजार. एकूण ग्राहक संख्येच्या 0.35 टक्के व एकूण वीज वापर 2 टक्के

सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहक 57 हजार. एकूण ग्राहक संख्येच्या 0.20 टक्के व एकूण वीज वापर 3 टक्के

इतर ग्राहक 1 लाख 82 हजार. एकूण ग्राहक संख्येच्या 1 टक्के व एकूण वीज वापर 2 टक्के

- एकूण थकबाकी

वर्ष 2014-15 ची थकबाकी 23224 कोटी

वर्ष 2015-16 ची थकबाकी 28106 कोटी

वर्ष 2016-17 ची थकबाकी 33449 कोटी

वर्ष 2017-18 ची थकबाकी 49320 कोटी

वर्ष 2018-19 ची थकबाकी 49399 कोटी

वर्ष 2019-20 ची थकबाकी 59833 कोटी

- विद्यमान थकबाकी-

वर्ष 2020-21 ची थकबाकी 71243 कोटी

वर्ष 2021-2022 ची थकबाकी 73879 कोटी

(July 2021)

Electricity Bill : तर राज्य अंधारात जाऊ शकतं:  नितीन राऊत
Raj Thackeray यांनी परप्रांतीयांबाबत केलेली 'ती' मागणी मान्य

थकबाकी - कृषी ग्राहक

वर्ष 2014-15 ची थकबाकी 11562 कोटी

वर्ष 2015-16 ची थकबाकी 14882 कोटी

वर्ष 2016-17 ची थकबाकी 19271 कोटी

वर्ष 2017-18 ची थकबाकी 24699 कोटी

वर्ष 2018-19 ची थकबाकी 31055 कोटी

वर्ष 2019-20 ची थकबाकी 40291 कोटी

वर्ष 2020-21 ची थकबाकी 47304 कोटी

- विद्यमान थकबाकी

वर्ष 2021-2022 ची थकबाकी 49575 कोटी

टीप : कृषी ग्राहकांवरील 10420 कोटी रुपयांची थकबाकी निर्लेखित करण्यात आली आहे.

- थकबाकी - पथदिवे ग्राहक

वर्ष 2014-15 ची थकबाकी 1408 कोटी

वर्ष 2015-16 ची थकबाकी 2021 कोटी

वर्ष 2016-17 ची थकबाकी 2751 कोटी

वर्ष 2017-18 ची थकबाकी 3500 कोटी

वर्ष 2018-19 ची थकबाकी 4145 कोटी

वर्ष 2019-20 ची थकबाकी 4507 कोटी

वर्ष 2020-21 ची थकबाकी 5811 कोटी

- विद्यमान थकबाकी

वर्ष 2021-2022 ची थकबाकी 6199 कोटी

- थकबाकी - सार्वजनिक पाणीपुरवठा

वर्ष 2014-15 ची थकबाकी 982 कोटी

वर्ष 2015-16 ची थकबाकी 1221 कोटी

वर्ष 2016-17 ची थकबाकी 1449 कोटी

वर्ष 2017-18 ची थकबाकी 1522 कोटी

वर्ष 2018-19 ची थकबाकी 1710 कोटी

वर्ष 2019-20 ची थकबाकी 1814 कोटी

वर्ष 2020-21 ची थकबाकी 2204 कोटी

विद्यमान थकबाकी-

वर्ष 2021-2022 ची थकबाकी 2258 कोटी

थकबाकी - सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे व इतर शहरी व ग्रामीण एकूण 7848 कोटी

(ग्रामीण 6876 कोटी, शहरी 865 कोटी)

- वसुली

कृषी ग्राहकांकडून वसुली -- 3.1%

सार्वजनिक पाणीपुरवठा वसुली - 67.1%

पथदिवे वसुली- 22.8 %

कर्ज व दायित्व (ऑगस्ट 2021)

दीर्घ मुदतीचे कर्ज (प्रकल्प) 14,547 कोटी

लघु मुदतीचे कर्ज (खेळते भांडवल) 30,893 कोटी

एकूण 45, 440 कोटी

- कर्ज व दायित्व - वर्षनिहाय कर्ज वाढ

मार्च 2015 - 17095 कोटी

मार्च 2016 - 21220 कोटी

मार्च 2017 - 27259 कोटी

मार्च 2018 - 29266 कोटी

मार्च 2019 - 35247 कोटी

मार्च 2020 - 39152 कोटी

मार्च 2021 - 42971 कोटी

जुलै 2021 - 45576 कोटी

ऑगस्ट 2021 - 45440 कोटी

मंजूर क्रॉस सबसिडी 2020-21

शेत ग्राहक यांना 9257 कोटींची क्रॉस सबसिडी

सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहक यांना 255 कोटींची क्रॉस सबसिडी

पथदिवे ग्राहक यांना 90 कोटींची क्रॉस सबसिडी

निवासी ग्राहक (100 युनीट पर्यंत) यांना 2042 कोटींची क्रॉस सबसिडी

इतर ग्राहक यांना 1118 कोटींची क्रॉस सबसिडी

एकूण क्रॉस सबसिडी 12762 कोटी रुपये

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com