महिनाभराच्या प्रतिक्षेने वीजेचा DP आला पण 5 मिनिटात...

दुरुस्ती करणाऱ्या एजन्सी आणि महावितरण अधिकाऱ्याचे रॅकेट; सरपंचाचा आरोप
महिनाभराच्या प्रतिक्षेने वीजेचा DP आला पण 5 मिनिटात...
Latur newsSaam tv

लातूर - गावखेड्यातील लोकांना गावातील किंवा शेतातील वीज समस्या ही काही नवीन बाब नाही. पण लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील जेवरीच्या सरपंच संजय जेवरीकर यांना आता थेट DP दुरुस्तीत रॅकेट असल्याचा आरोप केला आहे.

हे देखील पाहा -

निलंगा तालुक्यातील जेवरी गावचे उच्चशिक्षित सरपंच संजय जेवरीकर यांनी सरपंच झाल्यापासून गावचा चेहरा मोहरा बदलला पण गावातील आणि शिवारातील वीज समस्या काही कमी होत नव्हत्या. जेवरी गाव तब्बल एक महिना अंधारात होते. कालच नवीन DP बसवला आणि गावात उजेड पडला पण हा केवळ 5 मिनिटेच सहाव्या मीनिटाला DP धडधडा जाळायला सुरू झाला आणि पुन्हा गावात काळोख पसरला.

Latur news
औरंगाबादेत 300 हून अधिक घरांवर फिरणार बुलडोजर; प्रशासनाकडून तयारी पूर्ण

अखेर सरारपंचानी वैतागून त्यांनी महावितरणवर थेट आरोप केला. DP दुरुस्ती करणाऱ्या एजन्सी आणि महावितरणचे अधिकारी यांचे आर्थिक हितसंबंध असल्याने दर्जेदार दुरुस्ती केली जात नाही थातुरमातुर दुरुस्ती केली जाते अश्या DP च्या दुरुस्तीवर पुन्हा लाखो रुपयांचा खर्च करून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो यातील काय भानगड आहे हे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी जनतेसमोर जाहीर करण्याच आव्हान दिले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.