वीज पडली अन जमिनीतून सुरु झाला पाण्याचा उफळा...!

जमिनीतून बोअरवेलसारखे पाणी याठिकाणाहून निघले आहे. बारामती तालुक्यातील कारखेल गावात निर्सगाचा चमत्कार पाहायला मिळाला आहे. परंतु एका दिवसात पाणी बंद झाल्याने निसर्गाचा हा चमत्कार फक्त एक दिवसा पुरताच मर्यादित होता.
वीज पडली अन जमिनीतून सुरु झाला पाण्याचा उफळा...!
वीज पडली अन जमिनीतून सुरु झाला पाण्याचा उफळा...!मंगेश कचरे

मंगेश कचरे

बारामती : बारामती तालुक्यातील कारखेल गावामध्ये कोरेश्वर मंदीर परिसरात रात्रीच्या पाऊसात विज जमिनीवर पडल्याने जमिनीतुन बोअरवेल प्रमाणे पाण्याचा प्रवाह निघत होता. त्यामुळं या घटनेबद्दल परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. Electricity fell and water started boiling from the ground

कारखेल येथील कोरेश्वर मंदीर परिसरात मेंढपाळ बकरी चराई करता असताना अचानक समोर जमिनीतुन पाण्याचा वाहताना दिसला, त्यामुळे या प्रवाहाने याठिकाणी मोठया प्रमाणात पाण्याचा साठा झालेला पाहायला मिळत आहे. या घटनेने परिसरात कुतुहलाचा विषय झाला असुन स्थानिक लोक याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

हे देखील पहा-

शनिवारी या परिसरात ढगफुटीचा पाऊस Rain झाला होता. त्यामुळे चोहीकडे पाणीच पाणी झाले होते. दरम्यान याच पावसात या परिसरात वीज पडल्याचे स्थानिकांनी सांगितले आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जमिनीतून पाणी उफळत असल्याचे नागरिकांना दिसले. त्यामुळे हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे.

वीज पडली अन जमिनीतून सुरु झाला पाण्याचा उफळा...!
रजनीकांत यांची राजकारणातून निवृत्ती जाहीर; राजकीय पक्ष बरखास्त

साचलेल्या पाण्यामुळे जमिनीतून उफळत असल्याने हा तलाव भरत आला त्यामुळे तेथील स्थानिक नागरिकांनी तलावातील पाणी भरावा फोडून सोडून दिले. त्यानंतर देखील जमिनीतून हवेचे बुडबुडे येत राहिले. मात्र दुसऱ्या दिवशी नागरिकांनी तलावाच्या परिसरात पाहणी केली, तेव्हा जमिनीतून येणारे पाणी बंद झाले असल्याचे निदर्शनास आले.

भूगर्भशास्त्रज्ञ महेश गायकवाड यांच्या मते, वीज पडल्याने मोठ्या स्वरूपाचे नैसर्गिक चमत्कार होऊ शकतो. किंवा जास्त पावसामुळे जमिनीत अंतर्गत सायपण झाल्याने अशा प्रकारे पाणी जमिनीत बाहेर येऊ शकते असे डॉक्टर पर्यावरण तज्ञ महेश गायकवाड यांनी सांगितले.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com