पारनेरमधील 11 गावांत कोरोनाचा धुमाकूळ, सर्वांचीच होणार टेस्ट

पारनेरमधील 11 गावांत कोरोनाचा धुमाकूळ, सर्वांचीच होणार टेस्ट
Corona Test Kit

मार्तंड बुचुडे

पारनेर ः पारनेर शहरासह 11 गावांत कोरोना रूग्णांची संख्या सातत्याने वाढल्याचे दिसून येत आहे. ती गावे कोरोनामुक्त करण्याचा संकल्प तहसीलदार ज्योती देवरे यांनी केला आहे. त्या साठी या गावात साठी शंभर टक्के आरोग्य व कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या गावात कंन्टोनमेंट झोन जाहीर करण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार देवरे यांनी दिली.

पारनेर तालुक्यात पारनेर शहरासह निघोज ,पठारवाडी, पिंपरी जलसेन, पिंपळगव रोठे, भाळवणी, जवळा, कर्जुले हर्या, लोणीमावळा, वनकुटे व जामगाव या 11 गावात गेली काही दिवसांपासून सातत्याने रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे त्या गावात (ता. 8 ) पासून तीन दिवस गावातील सर्वांची आरोग्य तपासणी व कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. (Eleven villages containment zones in Parner taluka)

Corona Test Kit
राळेगणसिद्धीत सफरचंदाची बाग, पंधराच गुंठ्यात १० लाख!

या गावात स्वतंत्रपणे एक अधिका-याची नेमणूक पालक म्हणून करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र आरोग्य तपासणी पथक नेमून गावातील सर्वांची आरोग्य व कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. हा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या आदेशान्वये घेण्यात आल्याचेही देवरे यांनी सांगितले. (Eleven villages containment zones in Parner taluka)

या गावात कंन्टमेंन्ट झोनही केला जाणार आहे. तसेच कोरोना बाधित रूग्णांसाठी भाळवणी व निघोज येथे कोविड सेंटर सुरू आहे. तेथे त्यांना ठेवण्यात येणार आहे. या गावात बाहेरून येणा-या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. तसेच या गावातील कोणासही बाहेर जावयाचे असेल तर त्यांना परत आल्यावर विलगीकरण कक्षात थांबावे लागणार आहे. या 11 गावात विलगीकरणकक्षही सुरू करण्यात येणार आहे. घरात विलगीकरण कक्षात कोणालाही थांबता येणार नाही. प्रत्येक गावात नेमणूक केलेल्या अधिका-यास तीन दिवस त्याच गावात थांबून हे काम पूर्ण करावयाचे आहे, असेही शेवटी देवरे यांनी सांगितले.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com