व्हाट्स अ‍ॅपवर स्टेट्स टाकत मृत्यूला कवटाळले

व्हाट्स अ‍ॅपवर स्टेट्स टाकून एका तरुण व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
व्हाट्स अ‍ॅपवर स्टेट्स टाकत मृत्यूला कवटाळले
व्हाट्स अ‍ॅपवर स्टेट्स टाकत मृत्यूला कवटाळलेसंजय तुमराम

संजय तुमराम

चंद्रपूर : व्हाट्स अ‍ॅपवर Whats App स्टेट्स टाकून एका तरुण व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. संदीप चौधरी असं या 25 वर्षीय व्यवसायिकाचं नाव आहे. त्याचे मिठाईचं दुकान चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे आहे.

या व्यावसायिकाचे चिमूर तालुक्यातील खडसंगी इथं मिठाईचं दुकान आहे. काल त्यानं त्याच्या व्हाट्स अ‍ॅपवर "बाय बाय" असं स्टेट्स टाकलं होत. ज्यामुळं मित्रांच्या मनात शंकेची पाल लगेच चुकचुकली. मात्र त्याच्या घरी मित्र पोहचेपर्यंत त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केलेली होती.

व्हाट्स अ‍ॅपवर स्टेट्स टाकत मृत्यूला कवटाळले
बसस्थानकात कपडे काढून धिंगाना! प्रकार कॅमेरात कैद

दुःखद म्हणजे 2 जुलैला संदीपचा वाढदिवस होता. तसेच त्याचे नुकतेच लग्न देखील ठरले होते. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, आत्महत्येच्या कारणांचा चिमूर पोलीस Police शोध घेत आहेत.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com