अहमदनगर मध्यवर्ती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कारवाईचा केला निषेध

ती त्वरित मागे घेण्यात यावी असे मत यावेळी निषेध करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केले.
अहमदनगर मध्यवर्ती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कारवाईचा केला निषेध
अहमदनगर मध्यवर्ती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कारवाईचा केला निषेधSaam TV

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील जळीत कांड प्रकरणी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर ठपका ठेऊन कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईचा आता शासकीय रुग्णलयातील कर्मचाऱ्यांकडून निषेध केला जात आहे. उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या कारवाईचा निषेध केला. रुग्णालयातील डॉक्टर, नर्स,आणि इतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या कारवाईचा निषेध केला. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील दुर्घटना दुर्दैवी होती, मात्र या दुर्घटनेस जे जबाबदार नाहीत त्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. ती पूर्णपणे अन्यायकारक आहे. ती त्वरित मागे घेण्यात यावी असे मत यावेळी निषेध करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केले.

अहमदनगर मध्यवर्ती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कारवाईचा केला निषेध
कंगणाच्या वक्तव्याचा निषेध - खासदार श्रीकांत शिंदे 

दरम्यान अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयच्या ICU विभागात झालेल्या अग्नीकांड प्रकरणी सहा जणांना निलंबित करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यांच्यासह डॉक्टर सुरेश ढाकणे वैद्यकीय अधिकारी, डॉ विशाखा शिंदे - वैद्यकीय अधिकारी, सपना पठारे - स्टाफ नर्स आसमा शेख आणि चन्ना अनंत यांचा या मध्ये समावेश आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी (Health Minister Rajesh Tope) याबाबत ट्विट Tweet
करून माहिती दिली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी ही मोठी कारवाई केली आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील ICU वॉर्डात आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शोकसंवेदना व्यक्त केली होता तसेच याप्रकरणाची सखोल चौकशी करून हलगर्जीपणासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते दरम्यान आज दोषींवरती कारवाई केले असल्याचे ट्विट आरोग्य मंत्री राजेश टोपें यांनी केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com