संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांच्या ईडी चौकशीत नेमकं काय झालं ?

ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही काही दिवसांपूर्वी समन्स बजावले होते, कारण...
Sanjay raut and varsha raut news
Sanjay raut and varsha raut news saam tv

मुंबई : येथील पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सक्तवसुली संचालनालय (ईडी) कस्टडीत आहेत. याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही काही दिवसांपूर्वी समन्स बजावले होते. दरम्यान, शनिवारी ईडीने (Enforcement Directorate) वर्षा राऊत यांची साडेनऊ तास चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. संजय राऊतांवर ईडीने कारवाई केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांवरही ईडीचा चौकशीचा ससेमीरा सुरुच आहे. त्यामुळे वर्षा राऊत (Varsha Raut) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज सकाळी ११ वाजल्यापासून वर्षा राऊत यांनी ईडीने चौकशी सुरु केली होती.

Sanjay raut and varsha raut news
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमदार शहाजीबापू पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले...

वर्षा राऊत यांच्या ईडी चौकशीत काय झालं ?

ईडी चौकशीत वर्षा राऊत यांना हे प्रश्न विचारले गेले, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रवीण राऊत यांच्याशी झालेल्या व्यवहारांची तुम्हाला माहिती होती का ? हे व्यवहार तुम्हाला सांगून करण्यात आले का ? तुम्हाला अंधारात ठेवून हे व्यवहार झाले का ? प्रवीण राऊत यांच्या खात्यातून १ कोटी ६ लाख रुपये तुम्हाला आले, ते कशासाठी ? तुमच्या खात्यात अनोळखी व्यक्तीकडून १ कोटी ८ लाख रुपयांचे व्यवहार झाले, हा व्यक्ती कोण आहे ? हे पैसे तुम्हाला कोणी पाठवले आणि कशासाठी पाठवले ?

Sanjay raut and varsha raut news
Vice Presidential election 2022: उपराष्ट्रतिपदाच्या निवडणुकीत जगदीप धनखर विजयी

अलिबागमधील जमीन खरेदी आणि दादरमधील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅट तुमच्या नावावर खरेदी करण्यात आला, ही खरेदी प्रक्रिया कशी पार पडली? अलिबागमधील जमीन आणि फ्लॅट खरेदी करताना रोख रक्कमेचा वापर झालाय का ? प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत आणि तुमच्या खात्यात लाखोंचे व्यवहार झालेत, हे कोणाच्या सांगण्यावरून झाले ? तुमचे पती संजय राऊत यांनी सांगिल्याप्रमाणे हे व्यवहार झाले आहेत का ? अशा प्रकारे ईडीने वर्षा राऊत यांच्या चौकशीदरम्यान प्रश्नांची सरबत्ती केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, काही झालं तरी शिवसेना सोडणार नाही, ईडीनं पुन्हा चौकशीसाठी बोलावल्यास हजर राहणार, अशी प्रतिक्रिया वर्षा राऊत यांनी दिली आहे. तर ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरं वर्षा राऊत यांनी दिली, असं सुनिल राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com