सर्वात मोठी बातमी : शिवसेना खासदार संजय राऊत ईडीच्या ताब्यात

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSaam Tv

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालय विभाग (ईडी)ने ताब्यात घेतलं आहे. आज सकाळी सात वाजताच्या सुमारास ईडीच्या पथकाने राऊत यांच्या घरी छापा टाकला होता. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून संजय राऊतांची ९ तास चौकशी करण्यात आली. पत्राचाळ व्यवहारात आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप राऊंतांवर करण्यात आला होता. राऊत ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सहकार्य करत नव्हते, अशीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, ईडीचं पथक संजय राऊतांना ताब्यात घेवून ईडीच्या कार्यलयाकडे निघाले आहेत.

Sanjay Raut
झारखंडमधील पैशांच्या घबाड प्रकरणी सोनिया गांधींनी तीन आमदारांवर केली कारवाई

संजय राऊत यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी लक्ष करुन चौकशीचा ससेमीरा लावला. त्यामुळे ईडीने त्यांना ताब्यात घेणं अपेक्षित होतं. केंद्र सरकारच्या जुमली कारभाराविरोधात शिवसेना रान उठवल्याशिवाय राहणार नाही. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत आहे. पत्राचाळ आर्थिक व्यवहारात जर काही गदारोळ झाला होता तेव्हाच राऊतांना ईडीने ताब्यात घ्यायचं होतं. ईडीने शिवसेनेच्या बुलंद आवाजाविरोधात कारवाई केलीय. अशा तपास यंत्रणांविरोधात शिवसेना आक्रमक भूमिका घेईल. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधकांचा नामोहरण करण्याचा प्रयत्न आहे. त्यांना शिवसेना संपवायची आहे. पण संपूर्ण शिवसेना संजय राऊत यांच्या पाठिशी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

Sanjay Raut
HDFC ग्राहकांना धक्का! आता अधिक EMI भरावा लागणार

तर राऊतांवर कारवाई केल्यावर भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, पत्राचाळ व्यवहारात संजय राऊत यांनी आर्थिक घोटाळा केला आहे. राऊतांची रवानगी आता तुरुंगात नवाब मलिक यांच्या बाजूच्या खोलीत व्हावी. तसेच संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतल्यावर महिला शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाल्या असून राऊतांच्या घराबाहेर ठिय्या मांडला आहे. संजय राऊत अंगार है, बाकी सब भंगार है, अशा घोषणा देत शिवसैनिक महिला राऊतांना पाठिंबा दर्शवत आहेत. संजय राऊतांना आम्ही ईडीच्या ताब्यात जाऊ देणार नाहीत, त्यांना आधी आम्हाला सामोरं जावं लागेल. आमचा ईडीविरोधात ठिय्या असाच सुरु राहील, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. दरम्यान, राऊतांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ईडीच्या प्रश्नांना प्रामाणिकपणे उत्तर दिलं असतं, तर संजय राऊतांवर अशी वेळ आली नसती, असं भाजपचे आमदार राम कदम यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com