नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या अभियंत्याची अखेर सुटका!

छत्तीसगड येथील बिजापूर जिल्ह्यात गोरना मनकेली येथून अपहरण केलेल्या अभियंत्याची नक्षलवाद्यांनी आज सुटका केली. अजय रोशन लकडा असे या अभियंत्याचे नाव आहे.
नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या अभियंत्याची अखेर सुटका!
नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या अभियंत्याची अखेर सुटका!संजय तुमराम

गडचिरोली : छत्तीसगड येथील बिजापूर जिल्ह्यात गोरना मनकेली येथून नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या अभियंत्याची आज सुटका केली. अजय रोशन लकडा असे या अभियंत्याचे नाव आहे. मनकेली भागात पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून बांधण्यात येणाऱ्या मार्गाची पाहणी करण्यासाठी अजय गेले होते.

हे देखील पहा :

सोबत त्यांचा कार्यालयीन शिपाई लक्ष्मण परतागिरी हाही होता. पाहणी करीत असतानाच धनुष्य घेतलेले नक्षली तिथे आले आणि त्यांनी दोघांचेही अपहरण केले. शिपाई लक्ष्मण याची दुसऱ्या दिवशीच सुटका केली, पण अजय यांना बंधक बनवून ठेवले. डोळ्यावर पट्टी बांधून जंगलात अनेक ठिकाणी त्याला फिरवण्यात आले.

नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या अभियंत्याची अखेर सुटका!
विद्युत रोहित्राजवळ विजेचा धक्का लागून बारा वर्षाची मुलगी गंभीररीत्या भाजली!

अजय यांची पत्नी अर्पिता यांना या घटनेने मोठा धक्का बसला आणि पतीच्या सुटकेसाठी त्या जंगलात भटकू लागल्या. अर्पिताचा टाहो स्थानिक माध्यमात ठळकपणे उमटला. बातमी नक्षलवाद्यांपर्यंत पोचली आणि आज सातव्या दिवशी नक्षलींनी जनअदालत घेऊन अजय यांची सुटका केली. मात्र या भागात रस्ते आणि पूल बांधण्याची हिंमत यापुढे करायची नाही, असा दम देऊन ही सुटका करण्यात आली.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com