इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारण समोर

पवन याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारण समोर
Engineering student SuicideSaam Tv

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरखेड शहरातील लक्ष्मीनगर २ या भागातील एका २५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पवन नरेंद्र ठाकरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पवन याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्याने बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या (Suicide) केल्याचे बोलले जात आहे. (Engineering student Suicide)

Engineering student Suicide
नागपूर: मुलीच्या मदतीने केली पतीची हत्या! आत्महत्येचा कांगावा अन्...

पोलिसांनी (Police) दिलेली माहिती अशी, पवन रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असल्याने सकाळी उशीरा उठायचा. पण आज १२ वाजून गेले तरी तो उठला नाही. म्हणून घरच्यांनी त्याच्या खोलीचे दार ठोठावले, तरीही आतून काहीच प्रतिउत्तर न आल्याने दार तोडून आत पाहिले. तर पवन हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेची माहिती उमरेड पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहचून उमरेड पोलीसांनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उमरेड ग्रामीण रुग्णालयात (Hospital) पाठवला. पुढील तपास उमरेड पोलीस करत आहेत.(Engineering student Suicide)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com