
मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajyasabha Election) महाविकास आघाडीसह भाजपमध्ये (bjp) चुरशीची लढत होण्याची शक्यता सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळं निर्माण झाली आहे. आमदारांच्या घोडेबाजाराची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. या निवडणुकीबाबत राजकीय नेत्यांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहे. मात्र, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्यसभा निवडणुकीपेक्षा काश्मीर पंडीतांच्या विषयाला अधिक महत्व दिले आहे.
राज्यसभा निवडणूक आम्ही जिंकूच, पण सध्या काश्मीर पंडीतांचा मुद्दा गंभीर आहे. काश्मीर पंडीतांसाठी महाराष्ट्राचे दरवाजे नेहमीच खुले आहेत.निवडणुका येतात आणि जातातपण सध्या काश्मीर पंडितांचा मुद्दा जास्त महत्त्वाचा आहे. सध्या काश्मीरमधील वातावरण चिंताजनक आहे, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी माध्यमांसमोर दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय, यावेळी काश्मीर मुद्यावर बोलतना ते म्हणाले, सर्वाधिक खेदजनक बाब म्हणजे इतक्या वर्षांनंतरही तेथील चित्र बदलले नाही.याउलट वातावरण आणखी खराब झाले आहे. केंद्र सरकार काय करणार, हे सांगावे लागेल.महाराष्ट्राचे दरवाजे नेहमीच काश्मीर पंडीतांसाठी खुले आहेत. काश्मीर पंडीतांवर काश्मीर फाईल चित्रपटाच्या़ प्रसिद्धीबाबत किंवा कमाईबाबत बोलणार नाही, आता जाब विचारण्याऐवजी काय ठोस पावले उचलता येतील, यावर ठोस कारवाई करावी लागेल.
दरम्यान, ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याबाबतही प्रतिक्रिया दिली. अयोध्या दौऱ्याचे नियोजन म्हणजे फक्त भगवान श्री रामाचे दर्शन घेणार आहे.तेथील संघर्ष आता संपला आहे. किल्ले शिवनेरी वरून तिथे माती घेऊन गेलो होतो. त्यानंतर योगायोगाने कोर्टाच्या केसला चालना मिळाली.निकालामुळे मंदीर निर्माण होत आहे. आता आशीर्वाद घ्यायला जात आहोत.
पर्यावरण दिनानिमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना शुभेच्छा आहेत.पण अशा मोहीम या १२ महिने सुरु ठेवण्याची गरज आहे. उद्या शासनाचा 'माझी वसुंधरा' हा पुरस्कार सोहळा होणार आहे. त्यात शासनाचे काम समजेल.एकूण ८२ पुरस्कारांचे वितरण उद्या केले जाईल, अंसही आदित्य ठाकरे म्हणाले.
ठिकठिकाणी वृक्षारोपण होत आहे ही चांगली बाब आहे. रस्त्याशेजारी जी जुनी झाडे आहेत, त्यामध्ये पिंपळ आणि वडाच्या झाडांचा समावेश आहे. जुनी झाडे कोसळून दुर्घटना होऊ नये म्हणून खबरदारी घेत आहोत. झाडांच्या फांद्या छाटणे आणि इतर काळजी घेतली जात आहे. नागरिकांनीही काळजी घ्यावी.आरेच्या जंगलात कारशेडच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज नाही, असंही आवाहन ठाकरे यांनी नागरिकांना केलं आहे.
Edited By - Naresh Shende
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.