पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर; शेकडो शिवसैनिक अयोध्येत दाखल

शहरात ठिकठिकाणी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचे पोस्टर्स आणि भगवे झेंडे लावण्यात आले आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर; शेकडो शिवसैनिक अयोध्येत दाखल
Aditya Thackeray Ayodhya Visit, Shivsena Latest Marathi NewsSaam Tv

मुंबई - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेकडून (Shivsena) जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आदित्य ठाकरे हे लखनऊ विमानतळावर दाखल होणार आहेत. (Aditya Thackeray Ayodhya Visit)

आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून १० ते १२ हजार शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याचे पोस्टर्स आणि भगवे झेंडे लावण्यात आले आहे. शरयू तीरावर शिवसैनिकांचे जत्थे जमायला सुरुवात झाली आहे. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या महाआरतीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह काही नेते आणि पदाधिकारी अयोध्येत दाखल झाले आहेत. स्थानिक शिवसेना नेत्यांकडून आदित्य यांच्या दौऱ्याची तयारी केली जात आहे. हा दौरा राजकीय नसून श्रद्धेचा असल्याचे त्यांनी याआधी म्हटले होते. याआधी आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा10 जूनला निश्चित करण्यात आला होता. पण राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अयोध्या दौऱ्याची तारीख बदलून 15 जून करण्यात आली.

Aditya Thackeray Ayodhya Visit, Shivsena Latest Marathi News
जूनचा अर्धा महिना झाला पण पाऊस नाही; शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

असा असणार आदित्य ठाकरे यांचा संपूर्ण दौरा

- सकाळी 11 वाजता लखनऊ विमानतळावर आगमन

-दुपारी 1.30 वाजता- अयोध्येत आगमन त्यानंतर इस्कॉन मंदिराला भेट

-दुपारी 2.30 ते 3.30 वाजण्याच्या दरम्यान पत्रकार परिषद

-दुपारी 4.30 वाजता- हनुमान गढी येथे दर्शन घेणार

- संध्याकाळी 5 वाजता- प्रभू श्री रामाचं दर्शन घेणार

-संध्याकाळी 6 वाजता- लक्ष्मण किल्ला येथे भेट देणार

-संध्याकाळी 6.45 वाजता- शरयू नदीच्या घाटावर आरती करणार

-संध्याकाळी 7.30 वाजता- लखनऊला प्रस्थान

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com