कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी अमरावतीत सुसज्ज यंत्रणा

'चिल्ड्रन वॉर्ड'ची पालकमंत्र्यांकडून पाहणी केली आहे. चिल्ड्रन वॉर्डमध्ये ८० खाटांची उपलब्धता आहे त्यापैकी ५१ ऑक्सिजन बेड २० आयसीयू बेड आहेत.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी अमरावतीत सुसज्ज यंत्रणा
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी अमरावतीत सुसज्ज यंत्रणाअरुण जोशी

अरुण जोशी

अमरावती : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या Third Wave मुकाबल्यासाठी यंत्रणा सुसज्ज करण्यात येत आहे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बालकांवरील उपचारांसाठी ८० बेड्सचा स्वतंत्र वॉर्ड Ward निर्माण करण्यात आला आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयातही बालरुग्णांसाठी ऑक्सिजन बेड Oxygen Beds राखीव ठेवण्यात आले असून, खासगी बालरुग्णालयांतही ऑक्सिजन बेडची तजवीज करण्यात आली आहे.

उपचार यंत्रणा उभारतानाच संभाव्य लाटेचा धोका कमी करण्यासाठी नियमपालन, सातत्यपूर्ण जनजागृती आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा व विविध विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील 'चिल्ड्रन वॉर्ड'ची Children's Word पाहणी पालकमंत्र्यांनी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, हरिभाऊ मोहोड आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या कमी झाली असली तरी संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा Health System सुसज्ज करण्यात येत आहे. या साथीपासून बालकांच्या सुरक्षिततेसाठी उपचार सुविधांत वाढ करण्यात येत आहे. त्यानुसार आवश्यक मनुष्यबळ प्रशिक्षित करण्यात आले आहे. खासगी बालरुग्णालयांतही खाटा आरक्षित ठेवण्यात येत आहेत.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी अमरावतीत सुसज्ज यंत्रणा
Khatron Ke Khiladi 11: थरारक स्टंट्सने भरलेला शो आजपासून सुरू

संभाव्य लाटेच्या मुकाबल्यासाठी ही तयारी करण्यात येत आहे. हे करत असताना लसीकरण कार्यक्रम सुरळीत होण्यासाठी प्रयत्न होत आहेत. आता बाधितांची संख्या कमी झाली असली तरी ती पुन्हा वाढू नये यासाठी दक्षता नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.

खासगी पेडियाट्रिक कोविड रुग्णालयात पारिजात हॉस्पिटलमध्ये ४० व गेट लाईफ हॉस्पिटलमध्ये ६० खाटा आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी दिली.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com