नेवासा तालुक्यात अॅग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना

नेवासा तालुक्यात अॅग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना
नेवासा तालुका अॅग्रो कंपनी

प्रा. सुनील गर्जे

नेवासे : व्यवहारात पारदर्शकता ठेवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना नेवासे तालुका ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचा लाभ व मार्गदर्शन मिळाले पाहिजे. निश्चित ध्येय व प्रामाणिकपणा असेल तर प्रत्येक उपक्रम देश सेवा व राष्ट्रीय हित जोपासतो असे प्रतिपादन श्री क्षेत्र देवगड (ता. नेवासे) येथील श्री दत्त देवस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले.

नेवासे तालुका ऍग्रो प्रोड्युसर कंपनी लि. या कंपनीचा लोकार्पण सोहळा गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते श्री क्षेत्र देवगड येथे पार पडला. यावेळी प्रभात दुधाचे संचालक किशोर निर्मळ, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय डमाळे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, फोरकास्ट ॲग्रो पुणेचे डॉ. संतोष सहाणे, ज्ञानेश्वर'चे संचालक काकासाहेब शिंदे, अजित मुरकुटे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, संतोष गव्हाणे उपस्थित होते. यावेळी अनेकांना सभासदत्व देवून प्रमाणपत्र देण्यात आले. (Establishment of Agro Producer Company in Nevasa Taluka)

नेवासा तालुका अॅग्रो कंपनी
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ; अधिसूचनेसाठी पुन्हा मुदतवाढ

नेवासे तालुक्यातील तरूणांचा ऍग्रो कंपनी स्थापण्याचा अभिनव उपक्रमात शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञान सहज व सोप्या भाषेत उपलब्ध व्हावे, शेतीमधील योग्य व्यवस्थापन करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे खत औषध, बियाणे कमी खर्चात उपलब्ध करून जास्तीत उत्पन्न तयार करून दर्जेदार पिकांची निर्मिती करून भाजीपाला, फळबागा, कडधान्य यांना चांगले बाजार मार्केट उपलब्ध करून देण्यासाठीचे ध्येय ठेवले आहे. अशी माहिती संचालक ऍड. बन्सी सातपुते यांनी दिली आहे.

यावेळी ऍड. रवींद्र नवले, योगेश म्हस्के, महेश फलके, सचिन नागपुरे अड रवींद्र गव्हाणे, सचिन गव्हाणे, सुनील मोरे, भारत करडक, संदिप कोलते, महेश नवले, अमृता सयाजी शेटे आदी संचालक उपस्थित होते.

सभासदांची अपेक्षा

तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या मालकीची बाजार समिती आणि ऊस प्रक्रिया उद्योगाकडे या कंपनीच्या माध्यमातून वाटचाल व्हावी, अशी अपेक्षा सभासदांच्या वतीने करण्यात आली.

तरूणांना रोजगार मिळेल

'हा उपक्रम शेतीसाठी पूरक असून प्रोत्साहन देणारा आहे. यामुळे चांगली फळभाजी निर्मिती व तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. जास्तीत जास्त शेक-यांनी या कंपनीत सभासद व्हावे.

-ऍड. वसंत नवले, संचालक, ऍग्रो प्रोड्युसर कंपनी, नेवासे. (Establishment of Agro Producer Company in Nevasa Taluka)

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com