Solapur: तब्बल २६ तासानंतरही सोलापुरात आयकर विभागाचा तपास सुरूच

सोलापूर शहरात जवळपास ७ ठिकाणी हा तपास सुरु आहे.
Solpaur News
Solpaur NewsSaam Tv

सोलापूर - यकर विभागाकडून (Income Tax) महाराष्ट्रात विविध ठिकाणी छापेमारीचे सत्र सुरूच आहे. काल म्हणजेच गुरुवारी आयकर विभागाने राज्यात 24 ठिकाणी छापे टाकले. दरम्यान सोलापुरात काल आयकर विभागाच पथक दाखल झालं होत. तब्बल २६ तास उलटून गेले तरी आयकर विभागाचा तपास अद्याप सुरूच आहे. सोलापुरातील (Solpaur) सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे. सोलापूर शहरात जवळपास ७ ठिकाणी हा तपास सुरु आहे. याबाबत अद्याप आयकर विभागाकडून कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हे देखील पाहा -

आयकर विभागाकडून ज्या व्यक्तींचा तपास सुरूय त्या व्यक्तींचा राजकीय वर्तुळातील बड्या हास्थीशी संबंध असल्याची ही चर्चा सध्या सोलापुरात आहे. त्यामुळ कालपासून सुरु असणाऱ्या आयकर विभागाच्या या तपासात नेमक काय घबाड हाती लागणार हे पाहणं आता महत्वाचं आहे.

Solpaur News
Wardha Accident News : पुलगाव महामार्गावरील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; कवठ्यात शाेककळा

आयकर विभागाचा मोर्चा कोल्हापूरकडे, अर्जुनवाडमध्येही छापेमारी

आज पुन्हा एकदा आयकर विभागाने आपला मोर्चा कोलाहपूरकडे (Kolhapur) वळला आहे. आयकर विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्जुनवाडमध्ये छापा टाकण्यात आला आहे. साखर कारखान्याच्या भागीदारीवरून आयकर विभागाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

सोलापूर,पंढरपूर सह अनेक ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीत कोल्हापुरातील भागीदाराच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला आहे. आयकर विभागाकडून घरातील सर्व कागदपत्रांची झाडाझडती करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com