पहिल्या बळी नंतरही बीड जिल्ह्यात ऊस गाळपाची स्थिती जैसे थे; शेतकरी आर्थिक अडचणीत

सद्यस्थितीत 7 ते 8 लाख मेट्रिक टन ऊस अद्यापही शिल्लक आहे.
पहिल्या बळी नंतरही बीड जिल्ह्यात ऊस गाळपाची स्थिती जैसे थे; शेतकरी आर्थिक अडचणीत
Saam tvBeed News

बीड - जिल्ह्यात उस गाळपाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास 5 लाख मॅट्रिक टन ऊस शिल्लक राहण्याची चित्र दिसत आहे. जर काही दिवसात हार्वेस्टर आणून उस शेताच्या बाहेर काढला नाही, तर शेतकऱ्यांवर मोठ संकट ओढवणार आहे. यातच ऊस तोडणीसाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी हा मोठा अडचणीत सापडला आहे. पेटवून तरी कसा द्याव? असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.

बीड जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने तब्बल 94 हजार हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे. अतिरिक्त ऊस गाळपाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना भेडसावत आहे. ऊस लावून 17 महिने होऊन गेलेत, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला हा ऊस कारखाना घेऊन जात नाही. त्यामुळे अक्षरशः ऊसाचं चिपाड होत आहे. त्यामुळं ऊसाचं करावं काय? पेटून द्यायचं म्हटलं तर स्वतःला आग लावल्यासारखे आहे. त्याला केलेला खर्च देखील निघत नाही, त्यामुळे आता पर्याय उरला नाही. अशी हतबलता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

हे देखील पाहा -

बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील शिरपूर गावातील शेतकऱ्यांनी यावर्षी पाऊस चांगला झाल्याने, ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात लावलं. कारखाना ऊस घेऊन जाईल, या आशेवर शेतकऱ्यांनी मोठी स्वप्ने पाहिली होती. मात्र ऊस तोडायला येऊन चार-पाच महिने झाले, तरी देखील कुठला कारखाना घेऊन जात नसल्याने, आता काय करायचं ? हा शेतकऱ्यापुढं मोठा प्रश्न आहे. शेतामधून ऊस बाहेर काढायचा म्हटलं तरी त्याला देखील खर्च येणार आहे..तर काही शेतकऱ्यांनी स्वतःहून ऊस तोडणी करून ठेवला आहे.

मात्र तोडून ठेवलेला चार दिवसापासून ऊस कोणता कारखाना घेऊन जात नसल्याने, आता पुढे काय करावे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.. महिन्याभराने उसाचे वजन घटत आहे, यातच तोडून ठेवलेला ऊस पुन्हा वाळत असल्याने, त्याच्या वजनात मोठी घट होऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याचे शेतकरी लक्ष्मण पवार यांनी सांगितलं.

बीड जिल्ह्यामध्ये उसाच्या संदर्भांमध्ये एवढं विदारक चित्र निर्माण झालं आहे, की हजारो हेक्‍टर वरील ऊस शेतामध्ये उभा आहे.. कारखानदार ऊस तोडणी करताना अगोदर आपल्या जवळच्या कार्यकर्त्याचा विचार करत आहे. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांनी करावे काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Saam tv
बलात्कार प्रकरणी कॉंग्रेस मंत्र्याच्या मुलाच्या अडचणी वाढ

यातच गेवराई तालुक्यातील अंजनगाव येथील शेतकऱ्यांनी ऊस तोडून जात नाही म्हणून स्वतःहा ऊस फड पेटवून त्याच फडाच्या शेतातील झाडाला, स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. यामुळं आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा धीर खचतो आहे, हे समोर आलं असून त्यामुळे या शेतकऱ्याला धीर आणि आधार देण्यासाठी सरकारने हेक्टरी अडीच लाख रुपयांची मदत करावी. अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे.. वेळीच मदत नाही केली तर आणखी बळी जातील. असंही ते म्हणाले आहेत.

उभ्या असलेल्या ऊसाला हेक्टरी शेतकऱ्याला एक लाख रुपये मदत कारखानदारांनी व शासनाने द्यावे. अशी आमची शेतकरी कामगार पक्षाची मागणी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री यांना जिल्ह्यातील ऊस नेण्यासाठी अपयश आले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचा ऊस हा शेतात उभा आहे.अशी टीका शेतकरी नेते मोहन गुंड यांनी केली.

दरम्यान बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी अक्षरशः मरणाच्या दारात उभा आहे. अगोदर अस्मानी आणि सुलतानी संकटांमुळे शेतकरी पुरता खचून गेला आहे.त्यामुळं नामदेव जाधव या शेतकर्‍यांनी आत्महत्या करून जीवन संपवलं. त्यामुळं आता तरी सरकार इतर शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणार का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.