तीन दिवसांनंतरही सनसिटी गास रस्ता पाण्याखालीच

तीन दिवसांनंतरही सनसिटी गास रस्ता पाण्याखालीच
वसई-विरार ः सनसिटी गास रस्ता तीन दिवसांपासून पाण्याखालीच आहे.

वसई-विरार ः कोकण आणि मुंबईत पावसाने रौद्ररूप धारण केले आहे. या पावसामुळे रेल्वे वाहतूक तसेच रस्ता वाहतूक विस्कळीत झाली आहे. काही ठिकाणी तर या पावसाने लोकांचा जीव घेतला आहे. वसई विरार येथील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्याने प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत. रस्त्यांवर दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी असल्याने वाहतूक धोक्याची बनली आहे.

या भागात तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे साचलेले पाणी अद्यापही काही परिसरात कायम आहे. दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या सनसिटी गास रस्ता तीन दिवसांपासून पाण्याखालीच आहे. या रस्त्यावरील पाण्याचा निचरा न झाल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. हा मार्ग सोडून पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. मात्र, त्यासाठी ८ ते १० किलोमीटर जास्त प्रवास करायला लागत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. Even after three days, the Suncity grass road is still under water

वसई-विरार ः सनसिटी गास रस्ता तीन दिवसांपासून पाण्याखालीच आहे.
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणाचा मुख्य सूत्रधार?

निर्मळ, गास, वाघोली आदी गावांना जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावर बहुतांशी ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे हा मार्ग प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे. तरीही काही वाहनधारक या मार्गानेच जाणे पसंत करतात. या पाण्यात अडकून वाहने बंद पडण्याचे प्रसंग घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी याच रस्त्यावर एक एसयूव्ही कार पाण्यात वाहून गेली होती. त्यानंतर नागरिकांनी दोरखंड वापरून वाहून गेलेल्या कारला पाण्याबाहेर काढले होते.

पाण्यात उतरून सेल्फी

पाण्याचा प्रवाह कायम असल्याने परिसर जलमय झाला आहे. या पाण्यात आणखी वाहने वाहून जाण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करतात. रस्ता सोडून वाहन खाली गेले तर जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. रस्ता बंद केला असला तरी मोठ्या प्रमाणात येथून वाहतूक होते आहे. काही परिसरातील हौशी नागरिक या पाण्यात उभे राहून सेल्फीही घेत आहेत. त्यांच्यासोबत मुलेही या पाण्यात जात पावसाचा आनंद घेत आहेत. त्यांनाही या पाण्याचा धोका होऊ शकतो.Even after three days, the Suncity grass road is still under water

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com