शरद पवार यांच्या दौऱ्याआधीच राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद येणार चव्हाट्यावर

यापूर्वी देखील राष्ट्रवादी पक्षाचे माजी मंत्री जयंत पाटील यांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गटबाजीतील वाद चव्हाट्यावर आला होता.
NCP News
NCP Newsभूषण अहिरे

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर येण्याचे चिन्ह दिसू लागली आहेत. यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत गटबाजीतील वाद चव्हाट्यावर आला होता.

त्यानंतर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या दौऱ्यादरम्यान देखील अंतर्गत गटबाजीचा वाद हा उफाळून आल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर आता स्वतः शरद पवार यांचा आज धुळे दौरा असतानाच त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून पुन्हा या दोन गटातील वाद चव्हाट्यावर येण्याचे चिन्ह बघावयास मिळत आहे.

पाहा व्हिडीओ -

शहरात लावण्यात आलेले स्वागताचे बॅनरवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) शहर जिल्हाध्यक्ष रंजीत भोसले यांच्या बॅनरवर माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांचा उल्लेख नाही तसंच त्यांचा फोटो देखील नाही. त्याचबरोबर त्यांच्याशी निगडित असलेल्या कुठल्याही कार्यकर्ते देखील या बॅनरवर फोटो किंवा उल्लेख करण्यात आलेला नाही.

तसंच दुसरीकडे माजी आमदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे (Anil Gote) यांच्या देखील बॅनरवर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले यांचा फोटो देखील नाहीये आणि त्यांच्याशी निगडित कुठल्याही कार्यकर्ताचा देखील फोटो नाहीये या दोन बॅनर वरून या दोन गटातील वाद पुन्हा बघावयास मिळत आहे.

NCP News
Vasai: मोबाईलवर खेळत-खेळत ती बाल्कनीत आली अन् होत्याचं नव्हतं झालं; चिमुकलीच्या दुर्देवी मृत्यूने हळहळ

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर पक्षाच्या अंतर्गत असलेला वाद चव्हाट्यावर आलेला असतानाच या वेळेस देखील हा वाद उफाळून येणार का याकडेच संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com