नांदेड शहरासह गावातील मिळकत पत्रिकांचे उतारे आता ऑनलाईन

मिळकत पत्रिकांची उतारे घेण्यासाठी आता नागरिकांना कार्यालयात येण्याची व अर्ज देण्याची आवश्यकता नाही.
नांदेड शहरासह गावातील मिळकत पत्रिकांचे उतारे आता ऑनलाईन
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड

नांदेड : नांदेड शहरासह जिल्ह्यातील इतर गावातील जेथे गावठाण भुमापन झाले आहे, अशा गावठणामधील मिळकत पत्रिकांसाठी आता नागरिकांना उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही. अर्जाच्या कार्यवाहीबाबतची माहिती https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/aaplichawdi/ महाभुलेख या संकेतस्थळवर उपलब्ध केली आहे. उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मिळकत पत्रिकांची नक्कल काढणे व फेरफारसाठी केलेल्या अर्जाची स्थिती पाहण्यासाठी महाभुलेख संकेतस्थळांचा वापर नागरिकांनी करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक भुमी अभिलेख एस. पी. सेठिया यांनी केले आहे.

ईज ऑफ डुईंग बिजनेस अंतर्गत भुमी अभिलेख विभागात Epcis प्रकल्प राबविण्यात आला असून त्याअंतर्गत नांदेड शहरासह नांदेड जिल्ह्यातील एकुण 212 गावांच्या 1 लाख 45 हजार 21 मिळकत पत्रि‍कांचे डिजीटल सिग्नेचर झाले आहे. या डिजीटाईज मिळकत पत्रिकांचे उतारे नागरिकांना आता ऑनलाईने https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या वेबसाईटवर पाहण्यासाठी तसेच त्याचे उतारे घेण्यासाठी उपलब्ध आहेत. मिळकत पत्रिकांची उतारे घेण्यासाठी आता नागरिकांना कार्यालयात येण्याची व अर्ज देण्याची आवश्यकता नाही. वेबसाईटवर विहित शुल्क भरणा करुन त्याचे उतारे नागरिकांना घरीच घेता येणार असून ते सेतु केंद्रावरही उपलब्ध होतील. सध्याच्या कोविड-19 च्या काळात नागरिकांना याचा चांगला लाभ होणार आहे.

हेही वाचा - 'या' एसटी चालकाची हिम्मत तर बघा ! पुलावरून पाणी जात असतान घातली बस

मिळकत पत्रिकांची नक्कल घेण्यासाठी आता नगर भूमापन कार्यालयात किंवा उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी अर्ज करण्याची आवश्यकता राहणार नाही. आपण कोणत्याही ठिकाणी मिळकत पत्रिकांची नक्कल एका क्लिकवर हस्तगत करुन घेऊ शकता. महाभुलेख संकेतस्थळ https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr वरुन डिजीटल स्वाक्षरी झालेले संगणीकृत मिळकत पत्रिकांची नक्कल नागरीकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

नागरीकांनी फेरफारसाठी नगर भुमापन कार्यालय किंवा उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयात अर्ज सादर केल्यानंतर हा अर्ज कार्यालयामार्फत ऑनलाईन भरणा केला जातो. या अर्जाच्या कार्यवाहीबाबतची माहिती नागरिकांना संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असेही जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com