उन्हाचा अतिरेक, पाणीटंचाईने लग्नांना ब्रेक!

चंद्रपूर जिल्ह्यातील हेटी नांदगाव या गावाच्या व्यथेने ग्रामीण भागातील असुविधांचे नागडेपण स्पष्ट झाले आहे.
उन्हाचा अतिरेक, पाणीटंचाईने लग्नांना ब्रेक!
Marriage | विवाह SaamTvNews

चंद्रपूर : पाणी टंचाईमुळे (Water Scarcity) गावातील मुलांचे लग्नच (Marriage) जुळत नसल्याचे धक्कादायक वास्तव चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात उजेडात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हेटी नांदगाव या गावाच्या व्यथेने ग्रामीण भागातील असुविधांचे नागडेपण स्पष्ट झाले आहे. ही टंचाई दूर करण्यासाठी ग्रामस्थ प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत.

हे देखील पाहा :

मात्र, निगरगट्ट प्रशासनाने ग्रामस्थांच्या व्यथा कानाआड केल्यात. वैतागलेल्या पालक आणि मुलांनी प्रशासनाकडे आपलं दुखणं मांडल; मात्र परिस्थिती जैसे थे आहे. इथले इच्छूक वर "बाबा लगीन" म्हणून ओरडत असले, तरी गावातील पाणी टंचाईमुळं मुलींचा या गावात यायला नकार आहे.

Marriage | विवाह
मोठी बातमी: संभाजीराजे राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार; 'स्वराज्य' संघटनेची घोषणा

चंद्रपूर जिल्ह्यातील चेकनांदगाव प्रादेशिक पाणी पुरवठा (Water Supply) योजनेतून सात गावाना पाणीपुरवठा केला जातो. या गावापर्यंत अंथरलेली भूमिगत जलवाहिनी जागोजाग फुटली आहे. त्यामुळे नळांना येणारं पाणी गढूळ असतं. तर काही भागात नळ येतच नाहीत, अशी भीषण स्थिती आहे. हेटी नांदगाव येथील गावात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत अल्प आहेत. काही विहीरी आहेत; मात्र त्यातील पाणी पिण्यास योग्य नाही. या स्थितीत गावापासून दूर असलेल्या नाल्यात खड्डा खोदून तिथल्या पाण्याने गावकरी तहान भागवतात.

Marriage | विवाह
शरद पवारांना दिलेल्या धमकीवरुन समता परिषद आक्रमक, पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या

ज्या नाल्यातून गावकरी पाणी भरतात, तो नाला गोंडपिपरी-सिरपूर राज्य मार्गावर आहे. रोज डोक्यावर हंडा आणि तासनतास पाण्याची प्रतीक्षा यामुळे महिलांच्या एकूण कामाचे तास आणि शेतशिवारातील कामे यावर विपरीत परिणाम झालाय. आता गावातील सोयरीकी रखडल्याने हेटी नांदगावातील नागरिकांनी प्रशासनाकडे आर्त विनवणी केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.