माजलगाव प्रकरणातील आरोपीला फाशी द्या- AIMIM

बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत, 9 वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या नराधम व्यक्तीने, अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
माजलगाव प्रकरणातील आरोपीला फाशी द्या- AIMIM
माजलगाव प्रकरणातील आरोपीला फाशी द्या- MIMविनोद जिरे

बीडच्या माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत, 9 वर्षीय चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या नराधम व्यक्तीने, अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढा मोठा प्रकार घडला असताना पोलीस अधिकाऱ्यानी, मात्र संबंधित आरोपीला कोर्टात हजर केल्यानंतर, pcr न मागता mcr मागितला.

आणि त्यावर न्यायाधीशांनी देखील mcr मंजूर केला. यामुळे पोलिस अधिकाऱ्यावर आमचा संशय असून, त्याची चौकशी करत कारवाई करावी व संबंधित आरोपीला लवकरात लवकर फाशी द्यावी. अशी मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेतून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर गफार कादरी यांनी केली आहे.

आम्ही त्या न्यायाधीशांच्या आदेशाची चौकशी करू, जरूरत पडली तर कोर्टात अपिल करू. आमची एकचं मागणी आहे, की त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे.ती आपल्या सर्वांची मुलगी आहे. याप्रकरणात न्यायाधीशांनी आपली ड्युटी करतांना तेवढी कार्यतत्परता दाखवली नाही.त्यामुळं त्यांची डिपार्टमेंटल चौकशी करून कारवाई झाली पाहिजे. अशी देखील मागणी डॉक्टर गफार कादरी यांनी केली आहे. तर याविषयी पीडित मुलीच्या आजोबांनी न्यायाची मागणी केली असून आरोपीला कठोर कारवाई करावी. अशी मागणी केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com