चक्क! बनावट नोटांची छपाई करून चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
चक्क! बनावट नोटांची छपाई करून चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाशSaam Tv

चक्क! बनावट नोटांची छपाई करून चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

तब्बल 6 लाख 75 हजारांच्या बनावट नोटा या टोळीकडून पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.

नाशिक - कोरोना Corona काळात काम नसल्याने चक्क बनावट नोटांची notes छपाई करून त्या चलनात आणणाऱ्या टोळीचा सुरगाणा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील 2 महिन्यांत बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दुसऱ्या टोळीला अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक Nashik जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या सुरगाण्यात बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना Police यश आले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे 500, 200 आणि 100 रुपयांच्या तब्बल 6 लाख 75 हजारांच्या बनावट नोटा या टोळीकडून पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या बनावट नोटांसह नोटा छपाईचे प्रिंटर, कागद आणि अन्य साहित्यही पोलिसांनी जप्त केले आहे. सुरगाण्याच्या भाजीबाजारात टोळीकडून 100 रुपयांची बनावट नोट चलनात आणण्याच्या प्रयत्नात संबंधित भाजी विक्रेत्या महिलेला संशय आल्याने बनावट नोटांचा हा गोरखधंदा उघड झाला.

हे देखील पहा -

धक्कादायक बाब म्हणजे नाशिक जिल्ह्यातील चांदवड, येवला आणि विंचूर पर्यंत या रॅकेटचे धागेदोरे असल्याचे तपासात समोर आले आहे. तर एक आरोपी हा सैन्यदलातील नोकरी सोडून आल्याची माहिती समोर आली आहे. तर एक आरोपीचा विंचूरमध्ये प्रिंटिंग प्रेसचा जुना व्यवसाय आहे. याचं व्यवसायाचा फायदा घेत कोरोना काळात काम नसल्याने संबंधित टोळीने बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचा गोरख धंदा सुरू केल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

चक्क! बनावट नोटांची छपाई करून चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
अलिबाग समुद्र किनारा काळवंडला; किनाऱ्यावर दीड किलोमीटर पर्यत तेलाचा तवंग

पोलिसांच्या माहितीनुसार, मागील दोन-अडीच महिन्यांपासून बनावट नोटा चलनात आणण्याचे काम या टोळीकडून सुरू होते होते. आदिवासी भागात बाजारात तसंच व्यापारी पेमेंटच्या माध्यमातून बनावट नोटा चलनात आणण्याचा गोरखधंदा केला जात होता. त्यामुळे आत्तापर्यंत या टोळीने किती बनावट नोटा चलनात आणल्या आणि कुठल्या कुठल्या भागात त्या चलनात आणण्यात आल्यात, हे शोधण्याचे  मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. दरम्यान, याचं भागात 2 महिन्यांपूर्वीही बनावट नोटा चलनात आणणारं आणखी एक रॅकेट पकडण्यात आलं होतं. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या भोळेपणाचा फायदा घेत बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आदिवासी भागाचा वापर तर केला जात नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com