POLITICS : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपांत तथ्य : प्रवीण दरेकर

महाविकास आघाडीतील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या फैरी सुरुच असुन आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मोठ्या घोटाळ्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
POLITICS : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपांत तथ्य : प्रवीण दरेकर
POLITICS : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपांत तथ्य : प्रवीण दरेकर SaamTvNews

शिरूर : किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर पुराव्यानिशी केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यांच्या आरोपाला दुजोरा देत आरोपामधे तथ्य असल्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. ते शिरुर येथे क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

पुढे बोलताना दरेकर म्हणाले, ओबीसी आरक्षणाविना निवडणूका घेण्यासाठी राज्य सरकारची चालढकल सुरु आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावे हि आमची भुमिका आहे. परंतु सरकारच्याच मनात आरक्षण द्यायची भूमिका दिसत नसून महाविकास आघाडी सरकारचा आरक्षणाच्या मुद्द्यावर वेळकाढूपणा सुरु आहे. न्यायालयाचा निर्णय येण्याआधीच राज्यसरकारने भुमिका घ्यायला हवी होती, असे म्हणत ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयाच्या निर्णयावर बोलताना त्यांनी सरकारला चिमटा काढला.

हे देखील पहा :

राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांबद्दल...

राज्यात महिलांवरील अत्याचार होत असताना पुण्यातही महिलांवरील अत्याचार, खूनांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देखील पुण्याचे असताना या घटनांवर अंकुश असायला हवा होता. मात्र, उलट पोलीसांचा धाक धरारा राहिला नसून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा गंभीर आरोप प्रविण दरेकरांनी करत अजित पवार, दिलीप वळसेपाटील यांना लक्ष केले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांबद्दल...

अनिल देशमुख गायब असल्याचे वृत्त सर्वत्र सुरु आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा महत्वाचा नेता म्हणून अनिल देशमुख ओळखले जातात. त्यामुळे ते जर गायब असतील तर त्यांचा पत्ता राष्ट्रवादीनेच आता सांगायला हवा. अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली. अनिल देशमुखांवर कारवाईची सर्व तयारी झाली असेल त्यामुळे इडीने अनिल देशमुख कारवाईत सीबीआयची मदत मागितल्याचा अंदाज प्रविण दरेकरांनी व्यक्त केलाय.

POLITICS : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपांत तथ्य : प्रवीण दरेकर
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच
POLITICS : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपांत तथ्य : प्रवीण दरेकर
Breaking Nashik | नाशिकमध्ये महिलेची दुचाकी अडवत, कारमध्ये नेऊन बलात्कार!

बैलगाडा शर्यत आणि मराठा आरक्षण गुन्हे...

बैलगाडा शर्यतीतील गुन्हे मागे घेण्याबाबत यापूर्वीही घोषणा करण्यात आली होती. मात्र, बैलगाडा शर्यतीवरील गुन्हे मागे घेतले गेले नाहीत आणि आता पंधरा दिवसांपुर्वी गृहमंत्र्यांनी पुन्हा तीच घोषणा केलीय मात्र अजुनही गुन्हे मागे घेतलेले नाहीत. त्यामुळे केवळ घोषणा करायची आणि अंमलबजावणी मात्र शून्य! यामुळे बैलगाडा मालकांच्या आशा चुरगळुन टाकण्याचे काम गृहमंत्र्यांनी केल्याचा गंभीर आरोप प्रविण दरेकरांनी यावेळी केला.

महिला आयोग, शक्ती कायदा...

राज्यात महिलांविषयी संवेदनाच राहिल्या नसलेल्या महिला आयोगाचे अध्यक्ष पद रिक्त आहे. तसेच याबाबत केंद्रीय महिला आयोगानेही ताशेरे ओढलेत, महिलांबाबत राज्यसरकारला संवेदना नाहीत त्यामुळे राज्यात गंभीर गुन्ह्यांच्या आणि बलात्काराच्या घटना राज्यसरकारचे नियंत्रण नसल्याने घडत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री यांनी राज्यातील घटना पाहता काहीतरी ठोस निर्णय घ्यायला हवा. परंतु, बैठकावर बैठका होत आहेत. जर निर्णय झाला नाही तर भाजप उग्र भुमिका घेणार असल्याचे देखील दरेकर म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

हेही वाचा :

POLITICS : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपांत तथ्य : प्रवीण दरेकर
Crime : प्रेमात धोका दिल्याने महिलेने केली प्रियकराची साखरपुड्या दिवशी हत्या!
POLITICS : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरील आरोपांत तथ्य : प्रवीण दरेकर
Breaking : Sakinaka Rape Case : ऍट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com