Rahul Gandhi: सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र फडणवीसांनी वाचावं, राहुल गांधी आपल्या वक्तव्यावर ठाम

सरकारला वाटत असेल की भारत जोडो यात्रा रोखावी, तर त्यांनी तसं करावं.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Saam TV

वर्धा : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबतच्या वक्तव्यावरुन भाजप, शिंदे गट आक्रमक झाला आहे. याबाबत बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांनी (Swatantryaveer Sawarkar) इंग्रजांना लिहिलेले पत्र माध्यमांसमोर वाचून दाखवलं. 'सर मी तुमचा नोकर राहू इच्छित आहे, असं सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, असं राहुल गांधी यांनी सांगितलं.

सावरकरांनी इंग्रजांना मदत केली, याबाबत मी स्पष्ट आहे, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीसांनी सावरकरांनी लिहिलेलं पत्र वाचावं, असंही राहुल गांधी यांनी म्हटलं. राहुल शेवाळे यांच्या यात्रा रोखण्याच्या मागणीवर राहुल गांधी यांनी म्हटलं की, यात्रा रोखायची असेल तर रोखा. आम्हाला काहीच अडचण नाही. कुणाचा काही विचार असेल तर तो मांडला पाहिजे. सरकारला वाटत असेल की भारत जोडो यात्रा रोखावी, तर त्यांनी तसं करावं. (Latest Marathi News)

Rahul Gandhi
Raj Thackeray : राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यावरुन मनसे आक्रमक; राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले 'हे' आदेश

भारतात गेल्या आठ वर्षात भीतीचं वातावरण आहे. द्वेष आणि हिंसा पसरवली जात आहे. भाजपचे नेते भारताचे शेतकरी, तरुणांनी बोलत नाही. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. यासाठी आम्ही भारत जोडो यात्रा सुरु केली आहे. लोकांना यात्रेची गरज नसती तर लाखो लोक यात्रेत सहभागी झालेच नसते.

उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

राहुल गांधी जे बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही. राहुल गांधी जे बोलले ते चूकच आहे. आमच्याबद्दल सांगायचं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात आदर आहे. स्वातंत्र्यावीरांबद्दल प्रेम कोण व्यक्त करतंय हे देखील पाहावं. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. सावरकरांनी जे स्वातंत्र्य मिळवून दिलं ते आज धोक्यात आलं आहे. ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्यवीरांप्रमाणे आधी वागायला शिका, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

Rahul Gandhi
ढोंगी प्रेम दाखवू नका, सावरकर आणि बाळासाहेबांना भारतरत्न द्या; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

मनसे आक्रमक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील या मुद्द्यावरुन आक्रमक झाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांनी भारत जोडो यात्रेत राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचे आदेश दिले आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com